Viral Video : गाव हे प्रत्येकासाठी खास असतं. नोकरी, शिक्षणासाठी आणि स्वत:च्या प्रगतीसाठी आपण अनेकदा गाव सोडतो पण गावाकडचे सुख कुठेच अनुभवता येत नाही. शहरात राहून सुद्धा गावाकडची आठवण येते. गावातील माणसे, आणि गोष्टी कुठेच अनुभवता येत नाही. अनेक जण वेळ मिळाला तसा गावाकडे जातात आणि चार दिवस राहून येतात. गावाकडचे सुख अनुभवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडची माणसं अंगणात बसून गप्पा मारताना दिसत आहे.

खरं तर शहरात अंगण नसतेच. अंगण हे फक्त गावातच दिसून येते. सकाळी अंगणात शेणाचा सडा टाकला जातो. रांगोळी काढली जाते. मुले दिवसभर या अंगणात खेळतात. सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ दिवा लावला जातो. जेवणानंतर याच अंगणात बसून गप्पा मारल्या जातात आणि अनेकदा खेड्यातील लोक अंगणात झोपताना सुद्धा दिसतात. हे गावाकडचं सुख कुठेच अनुभवता येत नाही.
सध्या या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल काही लोक अंगणात बसून गप्पा मारताना दिसत आहे. मजा अन् गप्पा गोष्टी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून गावाकडची आठवण येईल. या व्हिडीओ ‘सुख कळले” हे लोकप्रिय गीत लावले आहेत.

If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
The puppy will cry after the owner's scream
“आई मला ओरडू नको…” मालकिणीचा ओरडा खाऊन श्वानाच्या पिल्लाला आलं रडू , VIDEO पाहून पोटधरून हसाल
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Video of a snake crawling on the hair of a sleeping woman went viral
झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल

हेही वाचा : “घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायलाही वेळ देत नाही” ८ सेकंदचा VIDEO पाहून अंगावर काटा येईल; काय घडलं?

पाहा व्हायरल व्हिडीओ

_jyoti_1_4_3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्या माणसाच्या बरोबर अंगणात बसून गप्पा मारणे हे सुख फक्त गावाला..”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी त्यांच्या गावाकडच्या आठवणी शेअर केल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “आजच्या पिढीला मोबाईल फोन मधून वेळ कुठे मिळतोय” तर एका युजरने लिहिलेय, “बरोबर आहे आणि उन्हाळ्यात तर वेगळीच मजा असते”

आणखी एका युजरने लिहिलेय, “हरवले ते दिवस आता शोधून ही सापडत नाहीत. शहराच्या गर्दीत जेव्हा जीव कोंडून पडल्यासारखा होतो तेव्हा आठवत आपलं गाव, आपली माणसं पण आता मात्र सगळच हरवल्या सारखं वाटतं. मग ते अंगण असो की आईने जपलेलं घरपण, एकत्र गुंफलेली नाती सगळं लुप्त झाल्यासारखं वाटत आणि मग आठतात “ते दिवस “अंगणात बसून कुटुंबाबरोबर मारलेल्या गप्पा, आजीच्या पदरात शिरून ऐकलेल्या गोष्टी हे सगळं मोबाइल ने हिरावुन घेतलं. त्या सोबत माणसाची माणुसकी पण नाहीशी झाली.आज सुट्टीला गावाकडे गेलं की मनाला खंत वाटते हे माझंच गाव आहेना, ही माझी च माणसं आहेत का हे सगळे गोड क्षण आज कुठेच पाहायला मिळत नाही आज आम्हाला माणसाच्या गर्दीत माणूस शोधावा लागतो.