Pune Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील वास्तु, मंदिरे, पुणेरी पाट्या, शिक्षण, खाद्यसंस्कृती इत्यादी अनेक गोष्टी नेहमी चर्चेत येतात. पुण्यातील पीएमटी ( Pune Municipal Transport) विषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल. दर दिवशी हजारो लोक या पीएमटीने प्रवास करतात. एक दिवस जरी पीएमटी बंद पडली तरी प्रवाशांची गैरसोय होते. सोशल मीडियावर पीएमटीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पीएमटीविषयी प्रेम व्यक्त करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा पुण्याच्या पीएमटीची कहाणी सांगताना दिसतो. हिन्दीमध्ये तो ही अनोखी कहाणी सांगतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण पुण्याच्या पीएमटीची कहाणी सांगताना दिसत आहे."ये कहाणी है पुणे के पब्लिक ट्रान्सपोर्ट की और इस कहाणी की हिरोइन है ये बस जो की मेरी नजरो मे क्वीन ऑफ पुणे स्ट्रीट. सीन कुछ ऐसा है तेरे भाई के पास खुद की गाडी नही है और इस खुबसुरत शहर को घुमने के लिए यही है मेरी साथी यही है मेरी सवारी. ४८६ रुट्स और साडे तीन लाख पॅसेंजर फिर भी २२०० बसेस तुम्हे पैदल घुमने नही देगी. हर जगह हर स्टॉप पे मौजूद, कहाणी का प्लॉट ट्विस्ट ये है जहा पेट्रोल के रेट आसमान छु रहे है ये क्वीन तुम्हे पचास रुपये के पास मे पुरा पुणे घुमाएगी. ये है मनपा बसस्टँड, ये तो बसेस का अॅमेझॉन डॉट कॉम. किसी भी रुट के लिए जाने के लिए ये क्वीन तुझे यही खडी दिखेगी तर घेऊन टाक पीस" ही गोष्ट सांगताना तो तुम्हाला व्हिडीओत पुण्यातील पीएमटी बसेस, मनपा बस स्टॉप, पुण्याचे रस्ते दाखवतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हेही वाचा : VIDEO: गावच्या महिलेचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप, विकी कौशल म्हणतो… पाहा व्हायरल व्हिडीओ thekarangade या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ पुणे" तर एका युजरने लिहिलेय, "पुण्याची रक्तवाहिनी" आणखी एका युजरने लिहिलेय, "पुण्यातील सर्वात सुंदर पार्ट" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी पुण्याच्या पीएमटीचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.