Premium

VIDEO : तुम्हाला शहरापेक्षा गाव आवडते का? व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल गावासारखा दुसरा स्वर्ग नाही…

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडचे राहणीमान दाखवले आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना गावाकडची आठवण येईल किंवा त्यांचे गाव आठवेल.

do you like village more than city
तुम्हाला शहरापेक्षा गाव आवडते का? (Photo : Freepik)

Viral Video : अनेक जण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गाव सोडून शहराकडे धाव घेताना दिसत आहे. गावाऐवजी शहरात घर बांधून तिथेच स्थायिक होत आहे. स्वप्नांच्या मागे धावताना आपण गावाकडे पाठ दाखवत आहोत पण शहरात वावरत असताना अनेकदा गावाकडची आठवण येते. गावाकडच्या गोष्टी आठवतात. तुम्हाला सुद्धा शहरापेक्षा गाव आवडते का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडचे राहणीमान दाखवले आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना गावाकडची आठवण येईल किंवा त्यांचे गाव आठवेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये गावाकडचे वातावरण, गोष्टी आणि राहणीमान दाखवले आहेत. सुरुवातीला नदीच्या किनारी वसलेलं सुंदर मंदिर दाखवले आहे. त्यानंतर एक आजीबाई बैलगाडीवर चालवताना दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती धान्य काढताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत काही नावाडी नौका चालवताना दिसत आहे. पुढे एक हिरवीगार सुंदर बाग दिसत आहे. या बागेतील झाडांवरील फुले आणि पानांवर फुलपाखरू उडताना दिसत आहे. एका झाडाखाली वयोवृद्ध लोकांचा कट्टा रंगलेला दिसत आहे. व्हिडीओत पुढे नदीकाठी तरुण मंडळी बसलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जणांना त्यांच्या गावाची आठवण येऊ शकते. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “धावत्या शहरापेक्षा शांत गाव भारी”

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

maharashtra_trending_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “
कोणा कोणाला शहरापेक्षा गाव आवडते ?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गावच्या सारखी मजा कुठेच येत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “गावची मजाच खूप वेगळी असते. गावात राहाल तर टेन्शन फ्री राहतो. छान हवा, पौष्टिक जेवण मिळते.शहरामध्ये सांगता येत नाही की कोणता दिवस हा शेवटचा आहे. गाव म्हणजे आनंद” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा किती काही झाले तरी गावाचे सौंदर्य शहराला काय..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you like village more than city watching video you feel like heaven village lifestyle video viral on instagram ndj

First published on: 07-12-2023 at 10:25 IST
Next Story
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; किंकाळ्या, धावपळीचा थरारक VIDEO व्हायरल