Viral Video : कोडे सोडवणे ही एक कला आहे. कोडे सोडवताना बुद्धीचा वापर करावा लागतो. कोडे सोडवताना आपण आपली बौद्धिक क्षमता ओळखू शकतो. सोशल मीडियावर अनेक कोडे विचारले जातात. काही कोडे सोडवायला खूप कठीण असतात तर काही कोडे खूप सोपी असतात. हे कोडे सोडवताना अनेकदा मजा येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सर्वांना एक कोडे सांगतो आणि ते कोडे सोडवायला सांगतो. तुम्ही हे कोडे सोडवू शकता का? (do you solve this puzzle)

काय आहे कोडे?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण विचारतो, “गण्याच्या वडिलांना तीन मुले आहे एकाचे नाव मे, दुसऱ्याचे नाव जून तर तिसऱ्याचे नाव काय?”

हेही वाचा : Kerala Wayanad: वायनाडमधील ‘हा’ VIDEO तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल; ६ दिवसांनी मालक दिसल्यावर कुत्र्यानं काय केलं पाहा

हेही वाचा : VIDEO: लेक पोलीस झाला अन् वडिल कृतज्ञ; लेकाच्या शिक्षकांसमोर वडिलांनी केलेली कृती पाहून डोळ्यांत येईल पाणी

तुम्ही हे कोडे सोडवू शकता का?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की अनेक जण याचे उत्तर जुलै देत आहे पण हे खरं उत्तर नाही. तुम्ही हे कोडे सोडवू शकता का?

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C9r7YYRSTed/?igsh=Z3BwMThubmJ0ZmY0

खरे उत्तर

या कोड्याचे खरे उत्तर आपण जाणून घेऊ या.
गण्याच्या वडिलांना तीन मुले आहेत.
एकाचे नाव जून आहे तर दुसऱ्याचे नाव जुलै आहे तर तिसऱ्याचे नाव हे गण्या असेल. कारण सुरुवातीला आपण गण्याच्या वडिलांचा उल्लेख केला आहे. प्रश्नामध्येच उत्तर आहे.

gavthi_comedy_wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” आता काय करायचं यांचं ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : बाबो, हा भूताशी तर बोलत नाही ना! इमारतीच्या सीसीटीव्हीतील ‘तो’ व्हायरल video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

काही युजर्सनी या प्रश्नाचे खरे उत्तर दिले आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिसऱ्याचं नाव गण्या” तर एका युजरने लिहिलेय, “अरे गण्या च्या बापाचे ३ पोर १. मे २. जून ३. गण्या म्हणून तिसऱ्याचे नाव गण्या आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, ” गण्या, मे, जून झाले तीन मुले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you solve puzzle ganyas father has three children first child name is may second child name is june then what is the name of third child watch viral video ndj
Show comments