Shocking video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. याचदरम्यान आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सर्दी-ताप जरी आला तरी आपण सर्वात आधी डॉक्टरकडे जाण्याचा विचार करतो. मुळात डॉक्टर म्हणजे देवदूत असतात असं म्हटलं जातं. डॉक्टर जणू नवीन आयुष्यच देत असतात. अशीच एक घटना घडली आहे. ज्यात डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.

घडलं असं की, डॉक्टरांसमोर रुग्ण बसला असतानाच अचानक हार्ट अटॅक आला. मात्र, डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांशी चर्चा करत असतानाच अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्ण खुर्चीतच अस्वस्थ झाला. यावेळी प्रसंगावधान राखत डॉक्टरांनी त्याच्या छातीवर हाताने हलकेसे ठोके देत त्याचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरसमोरच बसलेले असून ते डॉक्टरांसोबत चर्चा करत आहेत. रुग्णही खुर्चीवर बसलेला आहे. इतक्यात रुग्णाला प्रचंड अवस्वस्थ वाटू लागतं. हे पाहताच डॉक्टर क्षणाचाही विलंब न करता रुग्णाजवळ जातात आणि त्याला मृत्यूच्या दारातून परत आणतात. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हल्ली अनेकांना कोणत्या परिस्थितीत कधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू येईल ते सांगता येत नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि जीव गेला, अशी परिस्थिती उदभवल्याचे दिसते.