बापरे! रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असतानाच डॉक्टरांमध्ये जुंपली, ऑपरेशन थिएटरचा Video पाहून धडकीच भरेल | doctors fight during patient surgery in hospital operation theatre shocking video clip goes viral on Instagram nss 91 | Loksatta

बापरे! रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असतानाच डॉक्टरांमध्ये जुंपली, ऑपरेशन थिएटरचा Video पाहून धडकीच भरेल

रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असताना डॉक्टरांमध्ये जोरदार भांडण का झालं? पाहा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ.

Doctors Fight In Hospital Viral Video
ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल. (Image-Instagram)

Doctors Fight Viral Video : सोशल मीडियावर रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्याची समस्या निर्माण झाल्यावर सर्वजण रुग्णालयाच्या दिशेनं धाव घेतात. प्रत्येक रुग्णाला वाटतं की, डॉक्टरांनी योग्य उपचार करून प्रकृतीत सुधारणा करावी. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर त्याच्या उपचार करण्यासाठी डॉक्टरांनाही शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. पण एका रुग्णालयात रुग्णाच्या शस्त्रक्रीयेवेळी धक्कादायक प्रकार घडला. रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये असताना डॉक्टरांमध्ये जोरदार भांडण झालं. रुग्णाचा शस्त्रक्रीया सुरु असताना डॉक्टरांमध्ये झालेली शाब्दिक चकमक कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असताना नेमकं काय घडलं?

रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला दाखल केल्यावर डॉक्टर शस्त्रक्रीया करतात आणि इतर काही जण त्यांना मदत करत असतात. पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण रुग्णाची शस्त्रक्रीया करण्याचं सोडून डॉक्टर एकमेकांमध्ये वादविवाद करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. काही गोष्टींवरून डॉक्टरांमध्ये मतभेद झाल्यावर त्यांच्यात वादाची ठिणगी पेटल्याचं व्हिडीओत दिसत आहे. डॉक्टरांचं भांडण सुरु असताना एका व्यक्तीने हा धक्कादायक प्रकार कॅमेरात रेकॉर्ड केला.

नक्की वाचा – Viral Video: पठाण नव्हे, आता सोशल मीडियावर ‘तेरे नाम’ची हवा, २३ मिलियन लोकांनी पाहिलेला व्हिडीओ एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

एक रुग्ण स्ट्रेचरवर झोपेलेला असताना डॉक्टरांची संपूर्ण टीम त्याच्या बाजूला उभी असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याचदरम्यान एका डॉक्टरने असं काहीतरी म्हटलं की शस्त्रक्रीया करणारा दुसरा डॉक्टर त्याच्यावर भडकला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांचा लाईव्ह फुटेज व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ rajkotmirrornews द्वारे इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलं, “अशाप्रकारचा व्हिडीओ रेकॉर्ड आणि पोस्ट करण्यासाठी कॅमेरामनचे धन्यवाद. अशा डॉक्टरांना नोकरीवरून निलंबीत केलं पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 16:38 IST
Next Story
Philips Layoffs: फिलिप्समध्ये पुन्हा होणार नोकरकपात! जगभरात ६००० जणांची नोकरी जाणार