सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकही गोष्ट आपली आईशिवाय पूर्ण होत नाही. दिवसभर आईच्या नावाचा जप करत असतो. आई हे कुठे ठेवलं, आई ते सापडत नाहीये म्हणत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तिची मदत घेत असतो ती मात्र डोक्यावर हजार कामांचा डोंगर असला तरी घरातील प्रत्येकाला काय हवं नको ते बघते आणि घरातील कामाचा भारही सांभाळते. अनेकदा प्रश्न पडतो की आपली आई इतकं सर्व कसं करते. त्याच उत्तर एकच आहे तो म्हणजे जुगाड. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या आईकडे जुगाड असतो. कोणतीही गोष्ट वाया जाऊ न देता त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्या आईला चांगले माहित असते. विशेषत: अन्न वाया जाऊ नये यासाठी प्रत्येक आई खूप प्रयत्न करते. अनेकदा या प्रयत्नाच्या नादात आपली साधीभोळी आई अशा गोष्टी करते ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. अशाच एका आईची सोशल मीडियावर चर्चा होता आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक आई आणि मुलांचा फ्रिजमध्ये ठेवलेल्या सामानावरून एक मजेशीर वाद सुरु आहे. अन्नाची नासधुस होऊ नये म्हणून ही आई प्रत्येक गोष्ट फ्रिजमध्ये ठेवते. फ्रिज अगदी खचाखच भरला तरी जागा करून काही नाही काही त्यात ठेवतच असते. जेव्हा मुलगा फ्रिज उघडून पाहतो तेव्हा त्याला आईने फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू पाहून धक्काच बसतो. व्हिडीओमधून मुलगा एक एक करून सर्व वस्तू बाहेर काढतो ज्यामध्ये अर्ध लिंबू, ब्रेड, डोनट, कैरी, बटाटा, भाजी, सत्यनाराणचा प्रसाद, खोबर, चपात्या, लोणचं अशा सर्व वस्तू बाहेर काढतो. व्हायरल व्हिडिओ सध्या सर्वांच लक्ष वेधून घेत आहे कारण हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”

हेही वाचा –“मुलांनी तर हद्द केली राव!” वर्गात शिक्षक शिकवत होते अन् मागच्या बाकावर बसून विद्यार्थी करत होते ‘हे’ काम, Video Viral

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर shadygodz नावाच्या पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक मराठमोळ्या आईची गोष्ट आणि त्यांचे फ्रिजवरील प्रेम”

व्हिडिओ नेटकऱ्यांनी खूप आवडला आहे. एकाने कमेंट केली की अर्ध कापलेले लिंबू महत्त्वाचे आहे कारण ते नसेल तर भारतीय फ्रिज वाटणार नाही”

दुसरा म्हणाला की, “भावा, माझी पण आई अशीच आहे, कळत नाही तिला कसं समजवावे”

तिसरा म्हणाला की,” फक्त महाराष्ट्रीयन आई नव्हे तर प्रत्येक स्त्री अशीच असते”

हेही वाचा –नवख्या चोराला धाडस नडलं! महिलेनं चोराबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

चौथा म्हणाला की,”त्याची आई त्याला कसे सहन करते? माझ्या आईने मला हाकलून लावले असते आणि फ्रिजचे दार बंद केले असते आणि माझे डोके फोडले असते आणि तिला त्रास देण्यासाठी मला सर्व वाईट शब्द ऐकवले असते. खरंच सांगतो, गंमत करत नाही.”

पाचवा म्हणाला की,”फ्रिज हा प्रत्येक आईची वैयक्तिक जागा आहे, त्यामध्ये हस्तक्षेप करून नका, मला वाटले की मी माझा फ्रिज पाहात आहे”

m

Story img Loader