scorecardresearch

कुत्रा समलिंगी असल्याचं समजून काढलं घराबाहेर; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

स्टॅनले काउंटी शेल्टरने फेझकोसाठी नवीन घर शोधण्यात मदत करण्याचे आवा

कुत्रा समलिंगी असल्याचं समजून काढलं घराबाहेर; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप (Photo : Instagram / @hollywoodunlocked)

आपण माणसं फार स्वार्थी असतो. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या कामाची आहे, तोपर्यंत आपण त्यावर प्रेम करतो. ज्या दिवशी आपली गरज संपते त्यावेळी आपण त्या गोष्टीला आपल्या आयुष्यातून वजा करतो. याउलट कुत्रा हा एक असा प्राणी आहे, जो आपल्या मालकावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणूनच कुत्र्यांच्या इमानदारीचे दाखले दिले जातात. परंतु नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे.

एका कुत्र्याच्या मालकाने आपल्या प्रिय कुत्र्याला सोडून दिले आहे. या कुत्र्याला सोडून देण्याचे कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या कुत्र्याचे नाव फेझको असून अमेरिकेच्या नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये ही घटना घडली आहे. स्टॅनले काउंटी शेल्टरने स्थानिक लोकांना या कुत्र्याला वाचवण्याची विनंती केली आहे.

Viral Video : तुम्ही कधी मगरीला हसताना बघितलं आहे का? नसेल, तर हा व्हिडीओ बघाच

चमत्कारिक गाव… इथं अनेकांना आहे एकच किडनी; कारण वाचून बसेल धक्का

स्टॅनले काउंटी शेल्टरने सांगितले की हा कुत्रा खूप चांगला आहे. तसेच लोकल टीव्ही चॅनेल डब्ल्यूसीसीबीवर सुद्धा या कुत्र्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की फेझकोच्या मालकाला वाटते की आपला कुत्रा समलिंगी आहे. याच कारणास्तव तो आपल्या कुत्र्याला या शेल्टरमध्ये सोडून गेला. तसेच त्यांनी असेही म्हटले की फेझको चार वर्षांचा असून त्याला माणसांमध्ये राहायला आवडते. तो अतिशय प्रेमळ आहे.

स्टॅनले काउंटी शेल्टरने फेझकोसाठी नवीन घर शोधण्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. जेव्हा लोकांना समजले की मालकाने त्याला समलिंगी समजल्यामुळे सोडले आहे, तेव्हा लोकांना खूप राग आला. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog abandoned at animal shelter because owner thinks he is a gay dog pvp

ताज्या बातम्या