Viral: कुत्र्याचा राजेशाही थाट; महिन्याला दीड लाखांचा होतो खर्च

ब्रिटेनमधील एलिसा थ्रोन या महिलेचं श्वानप्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Fabia_Dog
Viral: कुत्र्याचा राजेशाही थाट; महिन्याला दीड लाखांचा होतो खर्च (Photo- fabio the fashion puppy)

रस्त्यावर मोकाट फिरणारे कुत्रे आपण रोजच पाहतो. रस्त्यावरील कुत्रे भूख भागवण्याासठी अनेकदा बेचैन दिसतात. अनेकदा रस्ते अपघातात जीवही गमवावा लागतो. मात्र दुसरीकडे, श्वानप्रेमी आपल्या कुत्र्यांची विशेष काळजी घेताना दिसतात. श्वानांवर इतकं प्रेम असतं की, त्यांचे हवे ते लाड पुरवले जातात. आता ब्रिटेनमधील एलिसा थ्रोन या महिलेचं श्वानप्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एलिसा थ्रोन वेल्सच्या पोंटिप्रिड येथे राहणारी आहे. तिने आयटीव्हीच्या शो असलेल्या दीड मॉर्निंग टुडेत सांगितलं की, आपल्या दीड वर्षाच्या चायनीज क्रेस्टेड पाउडर पफची विशेष काळजी घेते. फॅबिया श्वानाला हवं नको ते सर्व दिलं जाते. यासाठी ती लाखो रुपयांचा खर्च करते.

कुत्र्यासाठी बागेत वेगळं घर तयार केल्याचं तिने यावेळी सांगितलं. तसेच रेनडियर स्ले आणि डॉग बॉबल्सने भरलेलं झाडंही लावलं आहे. फॅबियासाठी सणासुदीच्या दिवसात खास कपडे आणि ज्वेलरी खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. फॅबियाचा वर्षाचा खर्च जवळपास २० लाख रुपये इतका आहे. ख्रिसमससाठी फॅबिया खास डिझायनर कपडे विकत घेतले आहेत.

एलिसा श्वानप्रेम फक्त फॅबियापर्यंत मर्यादित नाही तर, तिच्या कपड्यांना साधर्म्य असलेलेच कपडे ती परिधान करते. त्याचबरोबर जिथे जाईल तिथे फॅबिया तिच्यासोबत असते. शॉपिंगला जाताना फॅबिया तिने खास केस तयार केला आहे. फॅबियावर खर्च करण्यामागचं कारणही एलिसाने सांगितलं आहे. तिला अपत्य नसल्याने ती मुलासारखंच श्वानावर प्रेम करत असल्याचे तिने सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dog clothes and maintenance costs rs 1 5 lakh per month rmt

ताज्या बातम्या