scorecardresearch

शेवटी आई ती आईच…वाघिणीच्या पिल्लांना कुशीत घेऊन कुत्रीने पाजलं दूध!; पाहा व्हिडिओ

प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनाला आनंद देऊन जातात.

Dog_Feed_Tiger
शेवटी आई ती आईच…वाघिणीच्या पिल्लांना कुशीत घेऊन कुत्रीने पाजलं दूध!; पाहा व्हिडिओ

प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनाला आनंद देऊन जातात. तसंच ते व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहण्याची इच्छा होते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक कुत्री वाघाच्या पिल्लांना दूध पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या हृदयाला भिडला असून या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे.

नॅचरल ब्युटी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या तीन पिल्लांना कुत्री दूध पाजताना दिसत आहे. वाघांची पिल्लंही निमूटपणे दूध पित आहेत. वाघाची पिल्लं आईच्या दुधाची कमतरता पूर्ण करत आहेत. मी तुमची आई नाही, असं त्या व्हिडिओवर लिहिण्यात आलं आहे. तसेच हसणारे दोन स्माइली टाकण्यात आले आहेत. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ अनेक प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

एका यूजरने लिहिलं आहे की, ‘ही कुत्री किती गोड आहे. पहिल्यांदाच असं दृश्य पाहायला मिळालं’. तर दुसरा यूजर म्हणतो की, व्हिडीओ कमाल आहे. तिसऱ्या एका यूजरने म्हटलं आहे की, कोण म्हणतं की प्राण्यांना भावना नसतात. हा खूप भावनिक व्हिडीओ आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog feeding milk to tiger cubs viral video rmt

ताज्या बातम्या