scorecardresearch

Viral Video : बूट घातल्यानंतर कुत्र्याची झाली अशी हालत; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की या कुत्र्याला चार बूट घालण्यात आले आहेत. बूट घातल्यानंतर या कुत्र्याची अवस्था पाहून हसायला येतंय.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं हसू थांबणार नाही.(Photo : Youtube/ ViralHog)

सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. कधी कधी हे व्हिडीओ अतिशय मजेशीर असतात, तर कधी कधी गंभीर. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कुत्र्याचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाहीत. यामध्ये आपण पाहू शकतो की या कुत्र्याला चार बूट घालण्यात आले आहेत. बूट घातल्यानंतर या कुत्र्याच्या रिअ‍ॅक्शन पाहून हसायला येतंय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा बूट घालून चालण्याचा प्रयत्न करत आहे. बूट घालून चालणे त्याला विचित्र वाटत आहे. बूट घातल्यामुळे त्याला चालता येत नसून तो सतत घसरत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हा कुत्रा खूपच अस्वस्थ वाटत आहे. महिनीनुसार, हा व्हिडीओ अमेरिकेच्या नॉर्थ डकोटाच्या एका सुपरस्टोरच्या आत शूट केला आहे. मोंटाना नावाचा कुत्राच नाही तर त्याचा मालकही त्याला बूट घालून चालताना पाहून खूप उत्साहित झाला होता. मात्र, कुत्रा बूट घालून दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

YouTube वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी; कायदेशीर कारणांमुळे लवकरच ‘हे’ अ‍ॅप होणार बंद

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

व्हायरल हॉग नावाच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. ४५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कंमेंट्स करत आहेत. तसेच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog funny actions after wearing shoes video went viral pvp

ताज्या बातम्या