Viral Video: प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात पुण्यातील एका मॉलमध्ये श्वान एकटाच खेळताना दिसत आहे.

समाजमाध्यमांवर सतत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या व्हिडीओंमध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज मिळवतात. अशातच आता एका श्वानाचा मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतोय, जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Viral Video Shows Students Dance On Fevicoal Se Song
हे दिवस पुन्हा येणे नाही…! ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून जुन्या आठवणीत जाल रमून
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही शकता की, पुण्यातील एका मॉलमधील एस्केलेटरवर श्वान एकटाच खेळत असून, त्यावेळी तो एस्केलेटरवर ये-जा करताना दिसत आहे. सुरुवातीला तो एका एस्केलेटरवरच्या पायऱ्यावर बसून खाली येताना आणि त्यानंतर वर जाणाऱ्या एस्केलेटरवरून पुन्हा वर जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘विसरू नको रे आई-बापाला’; 2G च्या काळातील VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवलं बालपण

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @punekar2.0_og या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने ‘पुणे तिथे काय उणे’, असे लिहिले आहे. दरम्यान, यापूर्वीदेखील श्वानांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात काही श्वान एकमेकांबरोबर खेळताना दिसले होते.

Story img Loader