सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कुत्रा स्विमिंग पूलमध्ये पडताना दिसत आहे. अनेकदा आपण कुत्र्याला वाचवण्यासाठी मालक स्विमिंग पूलमध्ये उडी मारत असल्याचं पाहिलं आहे. मात्र यावेळी आसपास कुणीच नसल्याने दुसरा कुत्रा त्याच्या मदतीसाठी पुढे येताना दिसत आहे. एखाद्या चित्रपटातील दृश्य असल्यासारखं तुम्हाला वाटेल. हा व्हिडीओ पाहताना अंगावर शहारा येतो. अखेर कुत्रा शर्थीचे प्रयत्न पाण्यात पडलेल्या मित्राला बाहेर काढण्यात यशस्वी होतो. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा स्विमिंग पूलच्या बाजूने जाताना दिसत आहे. अचानक पाय घसरल्याने तो स्विमिंग पूलमध्ये पडतो. यानंतर बाहेर निघण्यासाठी कुत्रा बरेच प्रयत्न करताना दिसतो. पोहून पुरता थकून जातो. त्याचा आवाज ऐकून दुसरा कुत्रा धावत त्याच्या मदतीला येतो. जवळपास ३४ मिनिटं हा प्रकार सुरु होता. अखेर दुसरा कुत्रा त्या कुत्र्याचं तोंड आणि मानेच्या मागच्या बाजूला पकडून त्याला खेचत बाहेर काढतो. हा संपूर्ण प्रकार घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. हा व्हिडीओ मालकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत आहेत. नेटकरी मित्राला वाचवण्याऱ्या कुत्र्याचं कौतुक करत असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.