आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात व्यग्र असते. माणूस एकमेकांकडे पाहायलाही विसरतो. कुणाच्या दुःखाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच उरलेला नाही. पण, अशा वेळी प्राणी मात्र ‘माणुसकी’ काय असते, हे आपल्या कृतीतून दाखवून देतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

एका लहानशा कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी एका कुत्र्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट रेल्वे ट्रॅकवर उडी मारली. हा प्रसंग खूपच थरारक आणि भावनिक आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चकित झाले असून, “खरी माणुसकी प्राण्यांकडूनच शिकायला हवी” अशा प्रतिक्रिया देत आहेत.हा व्हायरल व्हिडीओ रेल्वे स्थानकावरील एका प्रसंगावर आहे.

रोजच्या गडबडीत कुणाच्या लक्षात न येणारी घटना या व्हिडीओत शूट केली गेली आहे. एक छोटं कुत्र्याचं पिल्लू रेल्वे ट्रॅकवर अडकलेलं दिसतं आणि त्याच वेळी समोरून ट्रेन येत असते. अशा वेळी एका कुत्र्यानं दाखवलेलं धाडस आणि ममतेची भावना सध्या चर्चेचा विषय बनला आहे.व्हिडीओमध्ये एक लहान कुत्र्याचं पिल्लू रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करताना अचानक खाली ट्रॅकवर पडतं.

ते वर येण्याचा प्रयत्न करतं; पण त्याला वरती चढता येत नाही. त्याच वेळी समोरून ट्रेन येताना दिसते. हे सगळं पाहून प्लॅटफॉर्मवर असलेला एक कुत्रा विचार न करता, थेट रेल्वे ट्रॅकवर उडी मारतो.तो आपल्या तोंडानं पिल्लाला पकडतो आणि त्याला पुन्हा प्लॅटफॉर्मवर चढवतो. काही सेकंदांचा हा प्रसंग थक्क करून जातो. कारण- ट्रेन अगदी जवळ आलेली असते; पण वेळेत पिल्लाचा जीव वाचतो आणि कुत्राही सुरक्षित बाहेर येतो.

पाहा व्हिडिओ

हा क्षण पाहून सर्वच भावूक होतील. हा व्हिडीओ ट्विटरवर @kadance01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे.व्हिडीओखालील प्रतिक्रियाही तितक्याच भावनिक आहेत. अनेक जण कुत्र्याच्या धाडसाचं आणि ममतेचं भरभरून कौतुक करत आहेत.

एकानं लिहिलं, “हा खरा हीरो आहे”, तर दुसरा म्हणतो “प्राणी माणसांपेक्षा जास्त संवेदनशील असतात”, तर तिसऱ्यानं लिहिलं “आज माणुसकी यांच्याकडून शिकायला हवी” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.काही नेटकऱ्यांनी मात्र हा व्हिडीओ AI द्वारे तयार केलेला असू शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. तरीही बहुतेक लोकांसाठी हा व्हिडीओ माणुसकीची आठवण करून देणारा ठरतोय.