Dog Snake Fight Viral Video : वन्यप्राण्यांविषयी अनेकांना फार कुतूहल असतं. प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. दरम्यान, सोशल मीडियावरही प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होता. त्यातील काही व्हिडीओंत प्राण्यांचा रोजच्या जगण्यातील संघर्ष पाहायला मिळतो. शिकार करो या शिकारी बनो हा जंगलाचा नियम आहे. शिकार करणं किंवा हल्ला झाल्यास प्रतिहल्ला करणं हे प्राण्याला यावं लागतं; अन्यथा तो जंगलात सुरक्षितपणे वावरू शकत नाही. रोज जगताना प्रत्येक प्राण्याला स्वत:च्या सुरक्षेसाठी अॅलर्ट राहावं लागतं. सध्या तीन कुत्र्यांचा जगण्या-मरण्याचा संघर्ष दाखविणारा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
तीन कुत्र्यांची सुरु होती मृत्यूशी झुंजत
व्हिडीओत तीन कुत्रे खोल विहिरीत पडल्याचे दिसून येत आहे. या कुत्र्यांव्यतिरिक्त विहिरीत विषारी साप आणि घोरपड असे प्राणीदेखील आहेत. यावेळी विहिरीत पडल्यानंतर हे कुत्रे आपापसांत लढत आहेत; तर दुसरीकडे मृत्यूशीही झुंजत आहेत. अशा परिस्थितीत एक सर्पमित्र तिथे येतो आणि तो धाडस आणि माणुसकी दाखवीत स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या विहिरीतून तीन कुत्र्यांना बाहेर काढतो आणि त्यांचे प्राण वाचवतो.
कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षण
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन कुत्रे अचानक एका शेतातील खोल विहिरीत पडतात. यावेळी विहिरीत विषारी साप आणि घोरपड यांसारखे प्राणी होते, ज्यांना पाहून कुत्रे खूप घाबरतात आणि अस्वस्थ होतात. यावेळी कुत्रे एकमेकांवर हल्ला करू लागतात; तर साप व घोरपडदेखील कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. कुत्र्यांसाठी तो जगण्या-मरण्याचा क्षण होता. यावेळी एक सर्पमित्र दोरीच्या साह्याने विहिरीत उडी मारतो आणि मोठ्या धाडसाने त्या कुत्र्यांना एकेक करून बाहेर काढतो. विहिरीबाहेर उभे असलेले इतर लोकही कुत्र्यांना बाहेर काढण्यात सर्पमित्राला मदत करतात. विहिरीबाहेर काही लोक दोरी धरून कुत्र्यांना बाहेर काढत, सर्पमित्राला मदत करीत असल्याचे दिसतेय.
कुत्र्यांना बाहेर काढल्यानंतर सर्पमित्र सर्व सापांना एका पिशवीत एकेक करून ठेवतो आणि नंतर तो घोरपडीला एका दुसऱ्या पिशवीत भरतो आणि नंतर त्या पिशव्यांना गाठ बांधून, त्या पिशव्या विहिरीतून बाहेर काढतो. हे सर्व केल्यानंतर सर्पमित्र सुखरूप विहिरीबाहेर येतो.
“मानवता अजूनही जिवंत आहे” युजरच्या कमेंट्स
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @muriwalehausla24 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे . हे पाहिल्यानंतर लोकांनी सर्पमित्राच्या शौर्याचे कौतुक केले. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “हा सर्पमित्र खरा हीरो आहे, ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या निष्पाप कुत्र्यांना वाचवले.” दुसऱ्याने म्हटले, “मानवता अजूनही जिवंत आहे. असे लोक नेहमीच इतरांना प्रेरणा देतात.”