लाइव्ह रिपोर्टिंग करताना पत्रकारांबरोबर काही वेळा फारच धक्कादायक; तर कधी मजेशीर घटना घडत असतात. ऑन एअर बोलत असताना कधी अचानक पत्रकाराच्या तोंडावर माशीच येऊन बसते. तर कधी पावसाने हातातील छत्रीच उडून जाते, रिपोर्टिंग करताना पत्रकारांबरोबर घडलेल्या मजेशीर घटनांचे विविध व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेच असतील. या पार्श्वभूमीवर लाइव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या एका पत्रकाराबरोबर एक मजेशीर घटना घडली आहे; जी पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होऊन जाईल. या मजेशीर घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हसायलाही तितकेच येईल. या व्हिडीओमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकराच्या हातावर एक कुत्रा झडप घेतो आणि तिचा माईक हिसकावून घेऊन पळ काढतो. त्यानंतर ऑन कॅमेरा ती महिला पत्रकार जे काही करते, ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

एअर माईक हिसकावून पळाला कुत्रा अन्…

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पत्रकार एका रस्त्याच्या कडेला लाइव्ह रिपोर्टिंग करत असते. यावेळी तिथे एक कुत्रा येतो आणि अचानक तिच्यावर हातातील माईकवर झडप घालतो. तो हिसकावून पळून जातो. यावेळी महिला पत्रकार त्याला रोखत प्रयत्न करत माईक घेण्याचा प्रयत्न करते. मात्र कुत्रा वेगाने धावत सुटतो. यावेळी ती महिला पत्रकार देखील कुत्र्याच्या मागे धावत जाते; मात्र काही वेळ पाठलाग केल्यानंतर कुत्रा तिला चकमा देत पुढे पळत सुटतो. यावेळी ही संपूर्ण घटना चॅनेलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सापांची अशी अनोखी जोडी पाहून लोक अवाक्; म्हणाले, “रस्त्यावरचा दुभाजक जातोय कुठे?”

ही घटना घडली तेव्हा पत्रकार ऑन एअर होती आणि न्यूज रूममध्ये बसलेल्या न्यूज अँकरला रिपोर्टिंग करीत होती. पण, अचानक घडलेल्या या घटनेने न्यूज अँकरही गोंधळून गेली. ही घटना पाहून तिलाही हसू रोखता येत नव्हते, ज्यामुळे तिने हसण्यापासून स्वत:ला कंट्रेल केले आणि आणि ब्रेक घेतला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रशियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, कुत्र्याला तिचे रिपोर्टिंग आवडले नाही. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, कुत्र्याला माइक हाडासारखा वाटला असेल; पण नंतर तो खूप पस्तावला असेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog snatches away reporter microphone while reporting on air in russia funny video goes viral sjr
Show comments