Viral Video : कुत्रे प्रामाणिक असतात. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि इमानदारीची उदाहरणे नेहमी दिली जातात. पण, हा प्राणी तितकाच उपद्रवीदेखील आहे. अनेकदा घरातील पाळीव कुत्रे चांगल्या वस्तूंबरोबर खेळताना त्यांची तोडफोड करून टाकतात. कधी कधी मस्ती करताना ते मालकालाही इजा पोहोचवतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एका कुत्र्याने मालक दूर असताना असा काही उपद्रव करून ठेवलाय की, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कुत्र्याने घरातील गादीवर ठेवलेल्या लिथियम बॅटरीशी खेळताना आग लावली. या घटनेचा एक व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. कुत्र्याने कुरतडली लिथियम बॅटरी अन् क्षणात उडाला आगीचा भडका हे प्रकरण अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील आहे. ओक्लाहोमाच्या अग्निशमन विभागाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये एका घरात दोन कुत्र्यांनी खेळता खेळता आग लावल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरात दोन कुत्रे तेथील गाद्यांवर खेळतायत. यावेळी एक कुत्रा खेळता खेळता गादीवर ठेवलेली एक रिमोटसारखी वस्तू तोंडाने कुरतडत बसतो. त्याने काही वेळ कुरतडण्याचा हा उपदव्याप केल्यानंतर त्यातून भीषण आग बाहेर येते; जी पाहून दोन्ही कुत्रे घाबरतात आणि दूर पळतात. कुत्रा तोंडाने चावत असलेली ती वस्तू रिमोट वगैरे नाही, तर चक्क लिथियम-आयन बॅटरी होती; जी तो चावत होता. त्याच बॅटरीमधून अचानक ठिणगी बाहेर पडली आणि आग लागली. त्यानंतर स्फोटही झाला. या स्फोटात घरातील दोन गाद्या आणि सोफा जळून खाक झाला. Read More Trending News : “रेल्वे पोलिसांनो, हिला ताबडतोब तुरुंगात टाका” रेल्वे स्टेशनवरील तरुणीचे कृत्य पाहून प्रवाशांचा संताप, VIDEO वर म्हणाले… कुत्र्यांमुळे घरात आगीची घटना ही घटना घडली तेव्हा घरात दोन कुत्रे व एक मांजर उपस्थित होती आणि घराचा मालक कुठेतरी दूर होता. कुत्रा ही बॅटरी बराच वेळ चघळत होता आणि त्यातून ठिणगी येईपर्यंत तो ती बॅटरी चघळत राहिल्याचे सांगितले जात आहे. ठिणगी बाहेर आल्यानंतर तिन्ही पाळीव प्राणी इकडे-तिकडे धावू लागले. मात्र, आगीच्या या दुर्घटनेत घराचे किती नुकसान झाले हे स्पष्ट झालेले नाही. ओक्लाहोमा अग्निशमन विभागाचे म्हणण्यानुसार, लोकांना सावध करण्यासाठी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या बॅटऱ्यांना आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या असून, या बॅटऱ्यांची योग्य प्रकारे देखभाल करून, त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची आमची इच्छा असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. आगीच्या वेळी सर्व पाळीव प्राणी घरातून सुखरूप बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबालाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.