scorecardresearch

Video: टीव्ही पाहून कुत्र्यानं घेतलं प्रशिक्षण, दोन पायावर चालताना पाहून तुम्हीही व्हाल आवाक

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात.

Dog_Training
Video: टीव्ही पाहून कुत्र्यानं घेतलं प्रशिक्षण, दोन पायावर चालताना पाहून तुम्हीही व्हाल आवाक

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकरी सर्वाधिक पसंती देतात. पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाळीव प्राण्यांमध्ये माणसाच्या जवळ राहणारा प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला काही जण आपल्या कुटुंबाप्रमाणे वागवतात. त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांना हवं नको ते देतात. त्यांच्या इच्छा पुरवण्याचा पुरेपुर प्रयत्न करतात. तर काही कुत्र्यांना इतकं जबरदस्त ट्रेनिंग दिलं जातं की मालकाची प्रत्येक कमांड फॉलो करतात. आता सोशल मीडियावर टीव्ही बघून ट्रेनिंग घेत असलेल्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कुत्र्याचं ट्रेनिंग पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. यात एक कुत्रा दोन पायांवर चालण्याचे प्रशिक्षण घेत असताना टीव्ही स्क्रीनवर पाहताना दिसत आहे. प्रशिक्षण घेतानाचा व्हिडीओ मालकाने आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केला आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडिओमध्ये कुत्रा टीव्ही पाहत शांतपणे बसला आहे. त्यानंतर तो टीव्हीवर दिसणारा कुत्र्याच्या हालचाली काळजीपूर्वक पाहतो. टेलिव्हिजनमध्ये एक ट्रेनर त्याच्या कुत्र्याला दोन पायांवर चालण्याचे प्रशिक्षण देताना दिसत आहे. हे पाहून कुत्राही पायावर उभे राहून चालण्याचा प्रयत्न करतो. तसेच पुश-अपपासून ते बसण्यापर्यंतचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. या बाबी अगदी सहजपणे करताना दिसत आहे.

आतापर्यंतया व्हिडीओला लाखो व्ह्यूज तसेच हजारो लाईक्स मिळाले आहेत. बहुतेक युजर्स कुत्र्याची स्तुती करत आहेत. तर काही युजर्स कुत्र्याचा तोल पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog training from watching tv video viral on social media rmt

ताज्या बातम्या