Chicken Dog Fight Video: सोशल मीडियावर नेहमीच कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मनाला भावणारे तर काही हैराण करणारे असतात. सध्या एक सर्वांचं लक्ष वेधून घेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका कुत्र्याची आणि कोंबड्याची लढाई बघायला मिळते. तुम्ही कुत्रे आणि कोंबड्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. अशात या दोघांच्या भांडणात बाजी कोण मारतं हे तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोकळ्या परिसरात कोंबडा आणि कुत्रा जोरदार भांडण करताना दिसतायेत. एकमेकांच्या अंगावर धावत येऊन ते आपला राग व्यक्त करत आहेत. मात्र या भांडणाच मोठ्या कुत्र्यावर छोटा कोंबडा भारी पडलेला दिसला. कोंबड्याने आपल्या हिंमतीने कुत्र्यालाही पळवून लावलं. सुरुवातीला व्हिडीओ बघताना वाटलं की, कुत्र्यापुढे कोंबडा हार मानेल आणि पळ काढेल मात्र त्याच्या जिद्दीने आणि हिमतीने त्याने कुत्र्यालाच धूम ठोकायला भाग पाडले. अवघ्या १० सेकंदात बाजी पलटलेली पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Shocking video lion and leopard clashed on a tree thrilling fight video went viral
VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट

जेव्हा माणूस किंवा प्राणी भांडतात, तेंव्हा… काही लोकांचा संपूर्ण फोकस व्हिडिओ बनवण्यावर असतो. होय, ते भांडण संपवण्याचा प्रयत्न करत नाहीत. फक्त सर्व काही कॅमेऱ्यात कैद करायचे आहे. सोशल मीडियाच्या या जमान्यात ‘माणुसकी’पेक्षा ‘व्हिडीओ’ बनवण्याची भावना लोकांमध्ये झपाट्याने विकसित होत आहे. याची अनेक उदाहरणे तुम्ही स्वतः पाहिली असतील. त्यातलच हे एक उदाहरण.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या viral_noni_36garh इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “हरला तोच आहे जो लढला नाही.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून लोकांनी कोंबड्याची हिंमतीला खूप दाद दिली आहे. सोशल मीडियाच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. मात्र विनोदी व्हिडिओ पाहायला लोकांना जास्त आवडतं. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला विशेष पसंती मिळते. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये.  

Story img Loader