scorecardresearch

कुत्रीचा प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “खऱ्या अर्थाने उर्जा मिळाली”

सोशल मीडियावर असाच एका कुत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रेरणा देणारा असून नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

Dog_Walk
कुत्रीचा प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, "खऱ्या अर्थाने उर्जा मिळाली"

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी व्हिडीओ पाहून हसायला येतं. तर कधी हे व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेरणा मिळते. सोशल मीडियावर असाच एका कुत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रेरणा देणारा असून नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. या कुत्रीला मागचे दोन पाय नाहीत. त्यावर मात करत ही कुत्री रस्त्यावर फिरताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना कुत्रीच्या मालकाने लिहिलं आहे की, “या कुत्रीचं नाव डिक्सी आहे. ती कधीही हार पत्कारत नाही. जन्माला येताच तिला लकवा मारला होता. त्यानंतर तिचं पालन करण्याची जबाबदारी आम्ही घेतली. तिला प्राण्यांच्या डॉक्टरांना दाखवलं. तिथे डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्यासाठी मागचे दोन पाय कापण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तसं करण्यात आलं”

“आता तिची त्र्याची तब्येत व्यवस्थित असून ती खंबीर आहे. डिक्सी क्वचितच व्हिलचेअर वापरते. तिला मनमोकळेपणाने फिरायला आवडतं”, असं व्हिडीओ शेअर करणाऱ्या मालकाने लिहिलं आहे.

प्रेरणा देणारा व्हायरल व्हिडीओ अनेकांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, हा व्हिडीओ खरंच प्रेरणा देणारा आहे. या व्हिडीओमुळे जीवनातील संकटावर मात करत कसं पुढे जायचं शिकायला मिळालं. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, खरंच या व्हिडीओतून जगण्याची उर्जा मिळाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog walking on two legs inspiration video viral on social media rmt

ताज्या बातम्या