कुत्रा-कुत्रीचं अनोखं लग्न, अत्यंत सुंदर असा VIRAL VIDEO एकदा पाहाच

या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या लग्नात नवरी-नवरदेवाच्या वेशभूषेत सजलेले कुत्रा-कुत्री इतके सुंदर दिसत आहेत, की त्यांना पाहून तुम्ही सुद्धा या अनोख्या जोडप्याच्या प्रेमात पडाल.

Dog-Bitch-Marriage
(Photo: Instagram/ heymynamesluna)

Dog-Bitch Marriage: सोशल मीडियावर एक अनोखा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. हा विवाह कुणा व्यक्तीचा नव्हे तर प्राण्यांचा आहे. चक्क कुत्रा आणि कुत्रीचं लग्न नुकतंच पार पडलंय. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या लग्नात नवरी-नवरदेवाच्या वेशभूषेत सजलेले कुत्रा-कुत्री इतके सुंदर दिसत आहेत, की त्यांना पाहून तुम्ही सुद्धा या अनोख्या जोडप्याच्या प्रेमात पडाल.

कुत्रा एक असा पाळीव प्राणी आहे, ज्याच्यावर सर्वजण खूप प्रेम करतात. कुत्र्यांचे व्हिडीओ पाहणे प्रत्येकाला आवडते. तुम्ही कुत्र्यांना खेळताना बागडतानाचे व्हिडीओ पाहिले असतील. परंतु तुम्ही कुत्र्यांचे लग्न कधी पाहिले आहे का? नसेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्य व्हाल. या लग्नासाठी कुत्रा आणि कुत्री दोघेही नवरी-नवरदेवाप्रमाणे सजून धजून आले होते. यात नवरीच्या वेशभूषेत सजलेली कुत्री इतकी सुंदर दिसून येत होते की सारेच जण तिच्या प्रेमात पडू लागले आहेत. तर कुत्रा सुद्धा नवरदेवाच्या लूकमध्ये हॅंडसम दिसून येत होता. नवरदेव कुत्र्याने काळा कोट घातला होता, तर वधू कुत्रीने सुंदर पांढरा गाउन आणि डोक्यावर फुलांनी सजलेला वेल घातला होता! किती सुंदर! लग्नानंतर हा कुत्रा नवरी बनलेल्या कुत्रीला किस देखील करताना दिसतोय. या दोघांची जोडी इतकी सुंदर दिसतेय की त्यांना नुसतं पाहातच राहावं असं डॉगी लवर्सना वाटतं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घोडा आणि कुत्र्यासोबत महिलेने सुरू केली स्केटिंग स्पर्धा, पाहा कोण जिंकतं?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अयोध्येच्या सरयू नदीत अंघोळ करताना पत्नीला केलं ‘KISS’, लोकांनी केली बेदम मारहाण

हा व्हिडीओ heymynamesluna नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाख ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर कमेंट्स करताना नवरी नवरी बनलेल्या कुत्रा कुत्रींचं कौतुक करताना दिसत आहेत. या दोघांच्या जोडीवर लोक आपल्या प्रेमाचा वर्षावर करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Doggo couple getting married is the cutest thing you ll see today viral video prp

Next Story
Video: जग घुमिया चाय! ‘या’ राजस्थानी मास्टरशेफचं कौशल्य पाहून तुम्हीही कराल कौतुक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी