Viral Video: सोशल मीडियाचं जग मजेदार आणि मनोरंजक व्हिडीओंनी भरलेले आहे. असे अनेक व्हायरल व्हिडीओ आहेत, जे कधीकधी हसवतात तर कधी रडवतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा बँडच्या तालावर भन्नाट नाचताना दिसत आहे. पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जास्त पाहिले जातात. त्यांची निरागसता आणि खोडकर शैली हृदयाला स्पर्श करते.
सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. इंटरनेटवर पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सामान्यतः जास्त पाहिले जातात. असाच एक गोंडस कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा आपल्या दोन्ही पायावर उभा राहून बँडच्या तालावर आनंदाने नाचताना दिसत आहे.
(हे ही वाचा: नवरीने वरमाळा घालताना केली चूक, वराला आला राग आणि मग…; video viral)
(हे ही वाचा: मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आईकडून पोलिसांनी करून घेतली मालिश, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ बघून युजर्सचे चेहरेही फुलले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर आतापर्यंत २५०.३ हजारांहून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याच वेळी, १४.७ हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी त्याला लाइक केले आहे. व्हिडीओ पाहून यूजर्स कुत्र्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत.