‘वन चाय प्लीज’ म्हणत मायक्रोसॉफ्टच्या सीईओने नागपूरच्या डॉली चायवाल्याने बनविलेल्या चहाचा आस्वाद घेतल्याचा व्हिडीओ अगदी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अनेक नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खोटा आहे, एआयनिर्मित आहे की काय, अशी शंकादेखील आली होती. मात्र, खुद्द बिल गेट्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तो व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही शंकेला जागाच उरली नव्हती.

चहा बनविणाऱ्या डॉलीची विशेष आणि आगळीवेगळी ‘स्टाईल’ पाहून त्याला हैदराबादच्या मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसमध्ये खास बिल गेट्ससाठी चहा बनविण्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. तसेच, ऑफिसमध्येच त्याच्यासाठी चहा टपरीची सर्व तयारी करून देण्यात आली होती. त्यानंतर डॉलीने बनविलेल्या चहाचा बिल गेट्सने आस्वाद घेतल्याचा व्हिडीओ आपण सर्वांनीच पाहिला आहे. मात्र, आता ही जोडी ‘अमूल’मुळे पुन्हा चर्चेत आलेली आहे.

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

असे होण्यामागे अमूलने शेअर केलेल्या एक ‘डूडल’चा [चित्राचा एक प्रकार] हात आहे. या डूडलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून, अमूलच्या अधिकृत पेजवरून शेअर झालेल्या या चित्रात नेमके काय आहे ते पाहू. चित्रामध्ये आपल्याला चहाची किटली, तसेच गाडीवर ठेवण्यात येणारे विविध बिस्किटांचे वगैरे डबे दिसतात. तसेच रंगीत गॉगल लावलेला डॉली आणि सुटाबुटातील बिल गेट्सचे अत्यंत सुंदर असे चित्र पाहायला मिळते. चित्रात बिल गेट्सच्या हातात चहाचा ग्लास दिसत असून, डॉलीच्या हातात ब्रेड-बटरची एक ताटली दिसत आहे. चित्रामध्ये वरच्या बाजूला ‘चायक्रोसॉफ्ट’ [Chaicrosoft] असा मजकूर लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो.

अशा या अमूल कंपनीने अत्यंत हुशारीने शेअर केलेल्या भन्नाट डूडलचे नेटकरी मात्र प्रचंड कौतुक करीत आहेत; तर काहींनी मिश्किल प्रतिक्रियादेखील दिलेल्या आहेत. नेटकरी नेमके काय म्हणतात ते पाहू.

“मार्केटिंग करावं तर असं…,” असे म्हणत एकाने प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्याने, “पण डॉलीनं तर फक्त चहा दिला होता..” अशी मस्करी केली. “नेहमीप्रमाणेच भन्नाट डोकं वापरलं आहे”असे तिसऱ्याने लिहिले आहे. “देवा! २०२४ मध्ये अजून काय काय पाहावं लागणार आहे,” असे चौथा म्हणतो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला डॉली आणि बिल गेट्सचा व्हायरल व्हिडीओ :

amul_india ने शेअर केलेल्या या डूडल’च्या फोटोला आतापर्यंत १२.७K इतके लाइक्स मिळाले आहेत.