Dolly Chaiwal Viral Video : सोशल मीडियावर फेमस झालेल्या ‘डॉली चहावाल्या’ची आता वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. कारण- तो केवळ भारतातच नाही, तर आता जगभरात फेमस झाला आहे. रोज त्याचे अनेक नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात तो अगदी लक्झरी लाइफ जगताना दिसतो, कधी आलिशान कारमधून प्रवास करताना, तर कधी परदेशातील पर्यटनस्थळांवर आनंद घेताना दिसतो. जेव्हापासून बिल गेट्स त्याच्या चहाच्या टपरीवर चहा पिऊन गेलेत, तेव्हापासून डॉली चायवाल्याचे आयुष्यच बदलले आहे. पूर्वी फक्त नागपूर शहरातील ग्राहकांमध्ये ‘डॉली चायवाला’ प्रसिद्ध होता; पण आता जगभरातील लोकांमध्ये तो फेमस झाला. यशाच्या नव्या उंची गाठत असताना त्याने आणखी एक नवे यश संपादन केले आहे. डॉली चायवालाने आता दुबईत आपले नवे ऑफिस उघडले आहे. त्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

पाहा डॉली चायवाल्याचा नव्या ऑफिसचा व्हिडीओ

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये डॉलीने सांगितले की, त्याने दुबईमध्ये नवीन ऑफिस उघडले आहे. व्हिडीओमध्ये त्याने ऑफिस कसे आहे हे दाखवले आहे; जिथे तो टेबलावर ठेवलेल्या लॅपटॉपसमोर बसून काम करताना दिसतो. व्हिडीओत पुढे त्याने त्याची नागपूरमधील चहाची टपरी दाखवली आहे; जिथे तो आपल्या ग्राहकांना खास पद्धतीने चहा बनवून देतोय. त्यानंतर त्याचा दुबईतील रोमांचक प्रवास दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये तो कधी वाळवंटात, तर कधी आलिशान वाहनांसह रील बनविताना दिसतोय.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

डॉली चायवाल्याचे दुबई टूरचे व्हिडीओ

डॉली चायवाला अनेकदा त्याच्या दुबई टूरचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतो. एकदा तो दुबईत एका मोबाईल शॉपमध्ये चहा बनविताना दिसला. त्यानंतर लोकांना वाटू लागले की, ‘डॉली’ने दुबईतही त्याचे चहाचे दुकान उघडले आहे. त्यात आता डॉलीचा हा नवा ऑफिस व्हिडीओ पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांनी कमेंट्स करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, तो या ऑफिसमध्ये काय काम करील, लॅपटॉपवर चहा बनवेल? दुसऱ्याने लिहिले की, हे पाहिल्यानंतर मला माझ्या सर्व डिग्रींना आग लावण्याची इच्छा होतेय. तिसऱ्याने लिहिलेय की, इथे लोक अभ्यासात आयुष्य वाया घालवतात, त्यापेक्षा चहा विकणे चांगले.

Story img Loader