सोशल मीडियावर फेमस झालेल्या डॉली चायवाल्याची आता वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही, कारण तो केवळ भारतातच नाही तर जगात फेमस झालाय. रोज त्याचे अनेक नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी आलिशान कारमधून प्रवास करताना तर कधी परदेशात फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. डॉलीची नागपूरमध्ये चहाची टपरी आहे, जी त्याच्या स्टाईलमुळे खूप प्रसिद्ध झाली, पण त्याने आता नागपूरहून थेट मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर आपला चहाची टपरी उघडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक परदेशी पर्यटक त्याच्या टपरीजवळ उभे राहून चहा पिण्याचा आनंद घेत आहेत.

डॉली त्याच्या खास चहा बनवण्याच्या स्टाइलमुळे खूप चर्चेत आला आहे. आता तो मालदीवमध्ये समुद्रकिनाऱ्यावर त्याच शैलीत चहा बनवताना दिसत आहे. डॉलीने अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आपली चहाची टपरी उघडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. जिथे उभा राहून तो आपल्या हटके स्टाईलने चहा बनवत आहे, तर त्याच्या मागे निळाशार स्वच्छ असा शांत समुद्रकिनारा दिसत आहे. डॉली चायवाला समुद्रकिनाऱ्यावर चहा बनवताना पाहून तिथे आलेले परदेशी पर्यटक त्याचा व्हिडीओ काढत आहेत, तर अनेक जण त्याच्या चहाचा आस्वाद घेत आहेत. डॉलीने चहा बनवल्यानंतर स्वत:च्या हाताने चहा त्या परदेशी पर्यटकांना दिला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.

डॉलीचा हा नवा व्हिडीओ त्याच्या @dolly_ki_tapri_nagpur या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “मोदींनंतर या चाय विक्रेत्याचा दबदबा आहे”. दुसऱ्याने लिहिले की, “मी माझा बायोडाटा त्याच्या टपरीवर ठेवण्याचा विचार करत आहे. डॉलीभाई समोर कोणी काही बोलू शकेल का?” अशाप्रकारे अनेकांनी डॉली चायवाल्याच्या नव्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

कुणी काढले कपडे, तर कुणी पडलं बेशुद्ध; विमानातील ‘ती’ परिस्थिती पाहून तुम्हालाही बसेल धक्का; video व्हायरल

कोण आहे बिल गेट्स यांना भेटलेला डॉली चहावाला?

डॉली चहावाला गेल्या १५ ते २० वर्षांपासून चहा तयार करण्याच्या आणि विकण्याच्या त्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीमुळे इंटरनेटवर चर्चेत होता. त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये म्हटले आहे की, तो महाराष्ट्रातील नागपूर येथील “प्रसिद्ध” चहा-विक्रेता आहे. फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर त्याचे १० लाखांपेक्षा पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. चहा देण्याच्या त्याच्या वेगळ्या शैलीसह त्याचा पोशाख देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्याने पिवळ्या रंगाचा गॉगल देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा चहाचा स्टॉल नेहमीच चहाप्रेमींनी गजबजलेला असतो. डॉली चहावालाल्या त्याच्या शैलीमुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांद्वारे ‘जॅक स्पॅरो ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखला जातो.