आयुष्यभर मोफत पिझ्झा; रौप्यपदक विजेत्या मिराबाई यांच्यासाठी डॉमिनोज इंडियाची मोठी घोषणा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मिराबाई चानू यांनी एका मुलाखती दरम्यान तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे असं सांगितल होत.

Dominos announces free pizza for life to Mirabai Chanu
वेटलिफ्टिंगमध्ये चानू यांनी रौप्यपदक जिंकले

टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची पदककमाई मिराबाई चानू यांच्यामुळे झाली. वेटलिफ्टिंगमध्ये चानू यांनी रौप्यपदक जिंकत ‘रौप्यक्रांती’ घडवली. चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील सुवर्णपदक, दोन राष्ट्रकुल पदके (२०१४-रौप्य, २०१८-सुवर्ण) आणि आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदकानंतर अखेर चानूचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न साकारले. तिच्या या कामगीरीने शनिवारी समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. तिच्या विजयाची बातमी येताच सर्वत्र आनंद व्यक्त झाला, आजही होत आहे. प्रत्येकजण या आनंदाच्या बातमीमध्ये आपल्यापरीने आनंद व्यक्त करत आहे. पिझ्झा जायंट डॉमिनोज इंडिया यांनी याचाच एक भाग म्हणून मिराबाई चानू यांना आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देणार असल्याची घोषणा केली.

पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त!

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मिराबाई चानू यांनी एका मुलाखती दरम्यान तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे असं सांगितल होत. आता हीच इच्छा बहुराष्ट्रीय पिझ्झा जायंट डॉमिनोज यांनी मिराबाई यांना आयुष्यभर नि: शुल्क पिझ्झा देण्याची घोषणा केली. डॉमिनोज इंडियाने घेतलेल्या या निर्णयाच सगळीकडे कौतुक होतं आहे.

डॉमिनोज इंडियाची ट्विट करत घोषणा

डॉमिनोज इंडिया शनिवारी मिराबाई चानू यांच्या ऑलिम्पिक रौप्यपदाच्या विजयानंतर एक ट्विट केलं. ‘भारताच्या ऑलिम्पिक पदकामध्ये आणि तुम्ही नेहमी जे म्हणता की मी फक्त एक तुकडा खाणार यात काय साम्य आहे? हे फक्त पहीलं आहे अनेकामधून’ या ट्विटवर गीतार्थ कलिता या युजरने “मिराबाई चानू जेव्हा भारतात परत येतील तेव्हा तिला पिझ्झा द्या .. मी तिचे बिल भरेन” या ट्विट वरती डॉमिनोज इंडियाने रिप्लाय देत म्हंटल की “तुम्ही बोललात आणि आम्ही ऐकलं. आम्ही कधीच असं नको आहे की मिराबाई चानू यांना पिझ्झा खाण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आयुष्यभर विनामूल्य डोमिनोजच्या पिझ्झा देणार आहोत.” ही घोषणा डॉमिनोज इंडियाने मिराबाई चानू यांच्या ऑफिशियल अकाऊटला टॅग करत केली.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

डॉमिनोज इंडियाच्या या ट्विट वर त्यांच्या या घोषणेवर अनेकांनी आपली प्रतिकिया नोंदवली. शुभम नावाच्या युजरने म्हंटले की, “कौतुक!! आमच्या मनात तुमच्या विषयी इज्जत अजून वाढली आहे. बॉलीवूडच्या कलाकारांना सगळे प्रमोशन्ससाठी फ्रीमध्ये देतात कधी खऱ्याखुऱ्या योद्ध्यांना देऊन बघा छान वाटत.” तर दुसरा युझर म्हणतो की, “तुम्ही खूप मस्त आहात.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dominos announces free pizza for life to mirabai chanu who won silver medal at tokyo olympics ttg

फोटो गॅलरी