आपण करोनावर मात करुन पूर्णपणे बरे झालो आहोत हे दाखवण्यासाठी ट्रम्प ही स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी प्रचारसभेमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केलं असून त्यांनी मास्कही घातलेले नाहीत असाही आरोप विरोधकांनी केला आहे. ट्रम्प यांनी करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या समर्थकांना हटकले नाही ही गोष्टही ट्रम्प यांच्या विरोधकांनी सोशल मीडियावर लक्षात आणून दिली आहे. ट्रम्प यांनी यावेळी दिलेल्या ६५ मिनिटांच्या भाषणामध्ये स्वत:चा उल्लेख करोना पीडित असा केला आहे. मात्र मी सध्या मला आधीपेक्षा अधिक शक्तीशाली आणि उत्साह वाढल्यासारखे वाटत आहे हे ही सांगायला ट्रम्प विसरले नाहीत.
My POTUS @realDonaldTrump pic.twitter.com/YQOMRt5bbO
— Ryann McEnany (@RyannMcEnany) October 13, 2020
करोनावर मात मिळवल्यानंतर ट्रम्प हे चार राज्यांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. यापैकी पहिल्यांदा ते फ्लोरिडामध्ये जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये ते वेगवेगळ्या राज्यांमधील मतदारांना संबोधित करणार आहे. अमेरिकेमध्ये करोनाच्या संकटाला तोंड देताना सरकारच्या भूमिकेवरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. अनेकांनी सरकारी धोरणांवर ताशेरे ओढले आहेत.
215,000 dead Americans and he’s out there doing this… pic.twitter.com/uYUddJcvNN
— Rex Chapman(@RexChapman) October 13, 2020
करोना संकट आणि करोनाविरुद्धची लढाई हा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील महत्वाचा मुद्दा आहे. अमेरिकेत करोनामुळे आथापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ८० लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.