Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते एका महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ देताना दिसत आहेत.सध्या ते अमेरिकेत रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी प्रचार करत आहेत. यादरम्यानचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका पिझ्झा पार्लरमध्ये एक महिला डोनाल्ड ट्रम्प यांना ऑटोग्राफ मागताना दिसत आहे. जेव्हा ती छातीवर ऑटोग्राफ मागते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प 'ओह माय गॉड' म्हणत महिलेच्या छातीवर ऑटोग्राफ देतात.पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, ट्रम्प त्या महिलेला तिच्या हातावरही एक ऑटोग्राफ देत आहेत. त्यानंतर ही महिला ट्रम्प यांना धन्यवाद म्हणते. ट्रम्प यांनी छातीवर ऑटोग्राफ दिल्यामुळे ही महिला आनंद व्यक्त करताना व्हिडीओत दिसत आहे. हेही वाचा : डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी, मजा-मस्तीमध्ये टोचले इंजेक्शन; चिमुकल्याला कळलेसुद्धा नाही, व्हिडीओ एकदा पाहाच Steven Steele या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.एका युजरने लिहिलेय, "महिलांचा आदर करा डोनाल्ड ट्रम्प", तर एका युजरने लिहिलेय, "एका चांगल्या नेत्याला असे असभ्य वागणे शोभत नाही." आणखी एका युजरने लिहिलेय, "महिलेने ऑटोग्राफ मागितला, त्यांनी दिला, त्यात चुकीचे काय आहे?"सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही, तर या आधीही २०१५ मध्ये त्यांनी असाच एक ऑटोग्राफ दिला होता, ज्यामुळे त्यांना टिकेला सामोरे जावे लागले होते.