scorecardresearch

Premium

लक्षात ठेवा! डाव कधीही पलटू शकतो; ‘हा’ VIDEO पाहून कळेल ‘संयम’ का महत्वाचा आहे…

Viral video: ‘हा’ VIDEO पाहून कळेल ‘संयम’ का महत्वाचा आहे…

When Celebrating Too Early Goes TERRIBLY Wrong
उतावळेपणा करु नका; संयम पाळा

जीवनात मिळालेल्या किंचित‎ यशाने हुरळून जावू नका. ध्येय दूरस्थ‎ ठेवून ते जिद्दीने गाठा. आयुष्यात ईच्छा,‎ महत्वाकांक्षा, ध्यास या तीन गाेष्टींकडे‎ लक्ष द्या. अशक्य गाेष्ट शक्य करायची‎ असेल तर त्यासाठी अथक परिश्रमाची‎ तयारी ठेवा, असा सल्ला आपल्याला मोठी माणसं नेहमी देतात. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचून जाऊ नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत, त्यामागे असलेले कारण या गोष्टीतून जाणून घेऊ. एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यातून यामागचं कारण अगदी सहज स्पष्ट होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एके ठिकाणी सायकलींगची स्पर्धा आहे. यामध्ये दोन स्पर्धक सर्वांच्या आधी पोहचले असून स्पर्धा जिकंण्यासाठी काहीच पावलं राहिली आहेत. यावेळी त्या दोघांनाही आधिच एकमेकांना मिठी मारुन अभिनंदन केलं, आणि तेवढ्यात मागून आलेला स्पर्धक पुढे गेला आणि त्यानं स्पर्धा जिंकली. यामुळं कोणतही यश लगेच साजरं करु नका, डाव कधीही पलटू शकतो. अशाप्रकारे शेवटच्या क्षणी हा डाव पलटला. मिळालेल्या यशाने आपण हुरळून जातो. एसएससीला पहिला आलेला नंतर कोठे दिसत नाही. त्यामुळे आत्मविश्वास बाळगा. यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने खचूनही जाऊ नका.

kitchen tips in marathi use bangle in rice
Kitchen Jugaad: तांदळात फक्त एक बांगडी टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Crocodiles tail was rubbed and washed then fried and eaten a strange video of a young girl
VIDEO: मगरीचं शेपूट घासून धुतलं मग तळून खाल्लं; नेटकरी म्हणतात, “आता हेच पाहायचं राहिलं होतं”
sonakshi sinha
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केलं नवीन घर; ‘अशी’ आहे ही अलिशान मालमत्ता
prank on mom
VIDEO: आईला मुलाने दिलं इतकं भयानक गिफ्ट; बॉक्स उघडताच भीतीने थरकाप, पाहा आत काय होतं

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! एका खेकड्याची किंमत लावली ५७ हजार; महिलेनं हॉटेल मालकाविरोधात पोलिसांत केली तक्रार

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. काही व्हिडीओ खूप काही शिकवून जातात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont celebrate too early even a second can change everything video viral srk

First published on: 21-09-2023 at 12:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×