रहाणीमानाच्या खर्चाचा विचार केला तर बंगळुरू हे भारतातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. हे टेक हब असल्याने येथे घरांची मागणी कायम जास्त असते, आणि त्यामुळे येथे भाडे देखील गगनाला भिडल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि रेडिटवर असे भाडेकरू त्यांचे अनुभव शेअर करताना पाहायला मिळतात. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या रेडिट पोस्टचे शीर्षक आहे, ‘तुमच्या ‘स्वीट’ बंगळुरू घरमालकावर विश्वास ठेवू नका’. त्यामध्ये, भाडेकरूने सांगितले की ते २०२२ पासून बसवनगरमधील एका फ्लॅटमध्ये राहत होता आणि त्यांचे तेथे राहण्याचे रेकॉर्ड एक जबाबदार आणि गोष्टींमध्ये सातत्य ठेवणारा भाडेकरू असे होते असेही त्याने सांगितले.
तेथे भाडेकरू म्हणून राहण्याचा संदर्भ देताना, त्या वापरकर्त्याने सांगितले की, “मी २०२२ पासून बसवनगरमधील याच फ्लॅटमध्ये भाडेकरू आहे. कधीही भाड्याचे पेमेंट चुकवले नाही, कधीही कोणतीही तक्रार आली नाही. माझे २०२६ चे भाडे कराराचे नूतनीकरण करण्याची वेळ झाली होती, आणि जेव्हा मी मालकाला विचारले की काही अटी बदलल्या आहेत का, तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे मेसेज केला: नाही.”
असा प्रतिसाद आल्यानंतरही या भाडेकरूने सांगितले की त्याने फक्त त्या मेसेजवर अवलंबून न राहता, ड्राफ्ट केलेला करार काळजीपूर्वक तपासून पाहिला आणि त्याची मागच्या वेळच्या कराराशी तुलना करून पाहिली. तेव्हा त्यामध्ये नोटीस पिरियड हा पूर्वीच्या करारात असलेल्या एक महिन्याच्या ऐवजी दोन महिने केलेला होता.
भाडेकरूने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “या कथेची शिकवण अशी की : जरी तुमचा घरमालक ‘नाईस अंकल’ असल्यासारखा वाटत असला तरी तो व्यावसाय चालवत आहे. त्यामुळे तुमच्या नवीन कराराची तुमच्या जुन्या कराराशी प्रत्येक शब्दा तुलना करा.” या पोस्टमध्ये वापरकर्त्याने व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला.
भाडेकरूनने त्यानंतर घरमालकाला आपण घर सोडत असल्याचे सांगून टाकले आणि घडलेल्या प्रकराबद्दल नाराजी व्यक्त केली.
थेट मुद्द्याल हात घालत त्यांनी घरमालकाला सांगितले की, “कृपया, पुढच्या वेळी तुम्ही फ्लॅटचे मालक आहात म्हणून तुम्ही हवे ते करू शकता हे समजू नका. माझ्याकडेही स्वत:च्या मालकीचा एक फ्लॅट आहे आणि मी माझ्या कोणत्याही भाडेकरूशी कधीही अशा प्रकारे वागलो नाही.”
या पोस्टवर इतर वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, ज्यामध्ये बंगळुरूमध्ये लोकांनी भाड्याने राहण्याबाबतचे स्वतःचे अनुभव शेअर केले आहे. अनेक नेटीझन्सनी सांगितले की, त्यांनाही भाड्याच्या अटींमध्ये अशाच प्रकारचे बदल अनुभवावे लागले आहेत. अनेकांनी घरमालकांनी वट्टेल तितके डिपॉझिट मागितल्याचे किंवा असेच काही अनुभव शेअर केले आहेत.
Don’t trust your “sweet” Bangalore landlord. Mine tried to trap me with a 2-month notice period during renewal.
by u/dj989 in bangalore
सर्वच वापरकर्ते जास्त नोटीस पिरियड वाढवल्याच्या विरोधात नव्हते. काहींनी असे सुचवले की, अशा अटी भाडेकरूंनाही संरक्षण देऊ शकतात. एका वापरकर्त्याने लिहिले की, “माझ्या घरमालकाने २ महिन्यांचा नोटीस कालावधी ठेवला होता आणि मी खुश होतो. मी त्याकडे अशा पद्धताने पाहिले की, बेंगळुरूमध्ये अपार्टमेंट शोधणे कठीण आहे, आणि जर त्यांना जास्त भाडे देणारा भाडेकरू मिळाला, तर त्यांना मला सहजपणे बाहेर काढणे सोपे जाणार नाही. कारण हे दोन्ही बाजूंनी लागू होते. माझं काही चुकत आहे का?”
याला उत्तर देताना, दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “तुम्ही विसरत आहात ती गोष्ट म्हणजे, जेव्हा त्याने काही अटी बदलल्या आहेत का, असे विचारले तेव्हा ओपीचा घरमालक खोटे बोलला. नोटीस पिरियड बदलण्याबद्दल त्याने ओपीशी कोणतीही चर्चा केली नव्हती.”
