scorecardresearch

एका उंदराच्या मागे लागले डझनभर कुत्रे; ६५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितलाय हा Viral Video

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे कुत्रे रस्त्यावरचे कुत्रे नसून पाळीव कुत्रे आहेत.

Dog Attacks Mouse Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @dinfowars / Twitter )

सध्या सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओला नेटीझन्सही पसंती दर्शवत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एक उंदीर डझनभर कुत्र्यांनी वेढलेला दिसत आहे. या व्हिडीओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामध्ये एका उद्यानात अनेक कुत्र्यांमध्ये एक उंदीर अडकलेला दिसत आहे.मांजर उंदराच्या मागे धावते हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण न्यूयॉर्कमधील या पार्कमध्ये अनेक कुत्रे उंदराच्या मागे लागले आहेत. कुत्रे उंदरावर हल्ला करताना दिसतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे कुत्रे रस्त्यावरचे कुत्रे नसून पाळीव कुत्रे आहेत. यादरम्यान श्वान मालकही त्यांना थांबवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ न्यूयॉर्कमधील टॉम्पकिन्स स्क्वेअर डॉग रनचा आहे.

या पार्कमध्ये अनेक कुत्रे फिरायला आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यादरम्यान तिथून एक कुत्रा येतो. यानंतर सर्व पाळीव कुत्रे त्या उंदरावर हल्ला करतात. काही कुत्रे त्या उंदराला चावताना दिसतात, तर काही जण त्याला बॉलप्रमाणे फेकताना दिसतात. दरम्यान, उंदराला वाचवण्यासाठी श्वान मालकही कुत्र्यांना असे करण्यापासून रोखताना दिसत आहेत. तो त्याच्या कुत्र्यांना धरून बसलेले दिसत आहे.

(हे ही वाचा: तीन भुकेलेले सिंह आणि एक मगर, कोण जिंकणार या लढाईत? बघा या Viral Video मध्ये)

(हे ही वाचा: घोडीसोबत उचलून नवरदेवाला लोकांनी बसवलं खाटेवर आणि हवेतच…; बघा वरातीतला भन्नाट Video)

अमेरिकेच्या उद्यानात उंदरांची दहशत

अमेरिकेतील उद्यानांमध्ये असलेल्या या उंदरांमुळे लोक हैराण झाले आहेत. त्यांच्यापासून सर्व प्रकारचे आजार पसरण्याचा धोका आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ६५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dozens of dogs attacks mouse more than 65 lakh people have watched this viral video ttg

ताज्या बातम्या