Premium

बापरे! ही बाई दररोज खाते अंगाला लावायची पावडर! नेमके प्रकरण काय ते जाणून घ्या…

रोजचे जेवण अन् सामान्य पदार्थांपेक्षा बेबी पावडर खाणे अमेरिकेतील एका महिलेला पसंत असल्याचे तिने स्वतः ‘द मिरर’ या वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले आहे.

American woman loves to eat baby powder
अमेरिकेतील ड्रेका मार्टिन नावाच्या महिलेला दररोज बेबी पावडर खाण्याची सवय आहे. [photo credit – freepik]

या पृथ्वीवर इतकी लोकसंख्या आहे की, त्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणती ना कोणती अशी एखादी सवय असेल; जी पाहून समोरच्याला आश्चर्य वाटेल. काहींना कुठल्या तरी वस्तू गोळा करण्याची सवय असते; तर काहींना अजून काही. परंतु, एखाद्या गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त आवड निर्माण झाली, तर तिचे रूपांतर हळूहळू व्यसनात होऊ शकते. सध्या अशाच अमेरिकेतील एका महिलेच्या सवयीने किंवा व्यसनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती सवय म्हणजे बेबी पावडर खाणे. होय! अमेरिकेतील या महिलेला दररोज बेबी पावडर खाण्याची सवय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेत न्यू ओर्लिन्स, लुईझियानामधील ड्रेका मार्टिन नावाच्या २७ वर्षांच्या एका महिलेने तिला ‘जॉन्सन्स’ची बेबी पावडर खाण्याचे व्यसन आहे. या वर्षात तिने आतापर्यंत या सवयीवर चार हजार डॉलर्स म्हणजे जवळपास तीन लाख ३३ हजार रुपये इतका खर्च केला आहे, असे ‘द मिरर’ला माहिती देताना सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार ड्रेका दिवसाला ६२३ ग्रॅमची ‘जॉन्सन्स’ची कोरफड आणि व्हिटॅमिन-ई हे घटक असणारी पावडर दररोज खाते. तिला ही पावडर आपल्या नेहमीच्या जेवणापेक्षा अधिक आवडते.

हेही वाचा : ग्राहकांकडून ‘या’ रेस्टॉरंटमध्ये चुकीच्या ऑर्डर्सदेखील हसून स्वीकारल्या जातात! काय आहे यामागचे कारण, पाहा…

खरे तर ‘जॉन्सन्स’च्या पावडरच्या डब्यावर अगदी स्पष्टपणे ‘ही पावडर केवळ त्वचेवर लावण्यासाठी आहे. तिचा वापर खाण्यासाठी करू नये’, असे लिहिलेले आहे. परंतु, तरीही ड्रेका ही पावडर आवडीने खात असून, तिच्यावर या सवयीचा कोणताही दुष्परिणाम झाला नाही किंवा कोणतेही पचनाचे आजारही झाले नसल्याचे ती म्हणते. ही पावडर खाण्याने मला आनंद मिळतो आणि माझे कोपिंग मेकॅनिझम [परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी लावलेली सवय] म्हणून मदत करते, असेसुद्धा द मिररला माहिती देताना म्हणाली.

ड्रेकाला, ‘पिका’ [pica] नावाचा आजार असू शकतो, अशी तिची शंका आहे. पिका [pica] या विकृतीमध्ये [disorder] एखाद्या व्यक्तीला खाण्यायोग्य नसलेली अशी कोणतीही वस्तू खाण्याची सवय वा व्यसन लागू शकते. ती तिची ही विचित्र सवय आपल्या नातेवाइक, मित्रांपासून, खासकरून तिच्या मुलापासून लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. तिला जर तिच्या मुलाने पावडर खाताना पाहिले, तर त्यालाही याबद्दल आवड निर्माण होईल की काय? अशी भीती ड्रेकाला वाटते.

परंतु, ड्रेकाने ही सवय घरच्यांपासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला असला तरीही बेबी पावडरच्या संपणाऱ्या बाटल्यांची संख्या पाहून, तिच्या घरच्यांच्या मनात कुतूहल आणि शंका निर्माण झाली आणि त्यांना तिच्या या सवयीबाबत समजले असावे. मात्र, त्यांची काळजी अगदी योग्य असली तरीही मला या सवयीपासून लांब राहता येत नाहीये, असे ड्रेका म्हणते.

हेही वाचा : अर्जित सिंगचे ‘हे’ गाणे ऐकताच कुत्र्यानेदेखील लावला सूर; सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मजेशीर व्हिडीओ पाहा…

“मला बेबी पावडर खायला खूप आवडते. त्या पावडरचा जसा वास आहे, अगदी तशीच त्याची चव आहे. ही पावडर खाण्याने मी कोणत्याही गोष्टीला सामोरे [cope] जाऊ शकते. त्यातून मला आनंद मिळतो,” असे ड्रेका मार्टिनने द मिररला माहिती देताना सांगितले आहे. त्यासोबतच तिचे हे पावडर खाण्याचे व्यसन इतके बळावले आहे की, आता ती खऱ्या पदार्थांपेक्षा पावडर खाणे अधिक पसंत करू शकते, असे तिला वाटते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dreka martin an american woman loves to eat baby powder everyday single day read why dha

First published on: 08-12-2023 at 22:03 IST
Next Story
“काळ कितीही पुढे जाऊद्या जुनं तेच सोनं!” उद्योगपती आनंद महिंद्रा रमले बालपणात; VIDEO शेअर करत दिला आठवणींना उजाळा