जास्तीत जास्त दारू प्या, जपान सरकारचं नागरिकांना आवाहन, कारण जाणून वाटेल आश्चर्य

दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वैद्यकीय विज्ञान म्हणते. पण याउलट जपान सरकार मात्र तरुणांना जास्त दारू पिण्यास प्रोत्साहन देत आहे.

जास्तीत जास्त दारू प्या, जपान सरकारचं नागरिकांना आवाहन, कारण जाणून वाटेल आश्चर्य
देशात दारूच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी "सेक व्हिवा!" अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pexels)

दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, असे वैद्यकीय विज्ञान म्हणते. पण याउलट जपान सरकार मात्र तरुणांना जास्त दारू पिण्यास प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे त्यासाठी देशव्यापी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. एका अहवालानुसार देशात दारूच्या सेवनाला प्रोत्साहन देण्यासाठी “सेक व्हिवा!” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना दारूच्या आहारी जाण्यासाठी नॅशनल एनटीएमार्फत ही मोठी मोहीम चालवली जात आहे.

तरुणांमध्ये दारूचा कल वाढावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेत २० ते ३९ वयोगटातील तरुण सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारू पिण्याचे प्रमाण कसे वाढवता येईल हे सांगावे लागेल. या स्पर्धेत जाहिरात (प्रमोशन), ब्रँडिंगसह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती तयार करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराला प्राधान्य दिले जाणार आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

‘मालकाला हिंदू कुटुंब हवे’ असे म्हणत बेंगळुरूतील महिलेला नाकारलं जातंय घर; ट्विटरवर स्क्रीनशॉट पोस्ट करत व्यक्त केला संताप

जपानमध्ये सरकार तरुणांना दारू प्यायला सांगत आहे, याचं कारण म्हणजे जपानची तरुण पिढी त्यांच्या पालकांपेक्षा कमी दारू पिते. याचा जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मद्यपानाचे प्रमाण कमी झाल्यामुळे साक (तांदूळापासून बनवलेल्या मद्याचा एक प्रकार) सारख्या पेयांवर मिळणारा करही कमी झाला आहे. म्हणूनच सरकारने आपल्या नागरिकांना दारू प्यायला लावण्यासाठी व्यवसायाची कल्पना विचारली आहे.

जपान सरकारने राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून ही कल्पना मागवली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्याची योजना आहे. तरुण पिढीने अधिकाधिक दारू प्यायल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. स्पर्धेतील सहभागींना अधिक मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कल्पना मांडावी लागेल.

चार पायांवर चालणाऱ्या सापाला पाहून नेटकरीही पडले बुचकळ्यात; हा Viral Video एकदा पाहाच

जपानमध्ये दारूचे सेवन कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दारू पिण्याकडे तरुणांचा उदासीन दृष्टीकोन असल्याचे सांगितले जात आहे. जपानमधील तरुण दारू पिण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. येथील तरुण त्यांच्या पालकांपेक्षा कमी दारू पितात. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे, त्यामुळे लोकांचे दारू पिण्याचे आकर्षण कमी होत आहे. त्याच वेळी, काहींचे म्हणणे आहे की देशाची जुनी लोकसंख्या हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे जपानमधील वाइन मार्केट कमी होत आहे. जागतिक बँकेच्या मते, जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश म्हणजेच २९% लोकसंख्या ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आहे.

‘घेऊन टाक’ म्हणत ‘या’ अमेरिकी माणसाने धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका; Viral Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

स्थानिक मीडियाने अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जपानमधील १९९५ मधील दारूचे सरासरी दरडोई सेवन १०० लिटरवरून २०२० मध्ये ७५ लिटरवर आले आहे. जपानी टाईम्सच्या वृत्तानुसार, जपानमध्ये दारूवर ५ टक्के कर आहे. हा एकूण कर महसूल २०११ मध्ये ३ टक्के आणि २०२० मध्ये आणखी घसरून १.७ टक्क्यांवर आला. मागील वर्षाच्या तुलनेत २०२० आर्थिक वर्षात अल्कोहोल करांच्या एकूण महसुलात ११० अब्ज येन म्हणजेच ८०६ दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त घट झाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सांगा प्राणी कोण? बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी