scorecardresearch

OMG: सुंदर दिसण्यासाठी ‘या’ देशात पितात कोब्रा सापाचं रक्त!

सुंदर दिसण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही तसंच वाटेल.

Snake_Blood
OMG: सुंदर दिसण्यासाठी 'या' देशात पितात कोब्रा सापाचं रक्त! (प्रातिनिधीक फोटो)

प्रत्येकाला वाटत असतं की कायम तरूण आणि सुंदर दिसावा. यासाठी काही जण कॉस्मेटिक, तर काही जण नैसर्गिक उपचार करतात. अनेक जण सुंदर दिसण्यासाठी सर्जरी करत असल्याच्या बातम्या आतापर्यंत वाचल्या असतील. मात्र सुंदर दिसण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही तसंच वाटेल. इंडोनेशियातील जकार्ता येथील महिला सुंदर दिसण्यासठी विषारी सापाचं रक्त पितात. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. ऐरव्ही सापाला नुसतं समोर बघितलं तरी अनेकांची बोबडी वळते. ज्या रस्त्याने सरपटत गेला आहे. तेथून जाणंही लोकं टाळतात. कारण सापाचा दंश थेट मृत्यूच्या दारात नेतो. पण जकार्तातील महिला कोब्रासारख्या विषारी सापाचं रक्त आवडीने पितात. कोब्रा सापाचं रक्त पिण्याची प्रथा इथे फार जुनी आहे.

जकार्तामध्ये सापाच्या रक्ताची मोठी मागणी आहे. यासाठी इथे रोज हजारो साप कापले जातात. सापाचं रक्त प्यायल्यानंतर तीन ते चार तास चहा किंवा कॉफी पिण्यास मनाई असते. कारण सापाचं रक्त व्यवस्थितरित्या शरीरात पसरण्याचा हेतू असतो. पुरुषही आरोग्य सदृढ राहण्यासाठी सापाचं रक्त पितात. तर महिला सुंदर दिसण्यासाठी सापाचं रक्त पितात. सापाचं रक्त प्यायल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहते, अशी जकार्तामध्ये मान्यता आहे.

Viral: आजोबांच्या बाइक स्टंटची सोशल मीडियावर ‘धूम’, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

दिवसभरात दुकानदार सापाचं रक्त विकून ५ ते १० लाख रुपये कमवतात. दुसरीकडे इथल्या सैनिकांना सापाचं रक्त पिण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. कारण युद्धाच्या वेळी सापाचं रक्त पिऊन जगता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drink blood of cobra snake in indonasia to look beautiful rmt

ताज्या बातम्या