सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये बरेचसे व्हिडीओ हे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तेलंगणा पोलिसांनी हा व्हिडीओ ट्विटरवर रिट्वीट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तेलंगणा पोलिसांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, ’३२ जीबीच्या फोनने ३१.९ जीबीचा भार उचलला.’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी एक चांगले काम केले आहे. पोलिसांनी म्हटले आहे, ‘मोबइलमघून गहाळ झालेला डेटा पुन्हा मिळवला जाऊ शकतो. पण आपल्या जीवनासोबत अले होऊ शकत नाही.’ त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की अशाप्रकारे स्वत:चे आणि इतरांचे आयुष्य धोक्यात घालू नका.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

केवळ ९ सेकंदाच्या या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी मस्करी करत आहेत, तर काहीजण संतापही व्यक्त करत आहेत. या दुचाकीस्वारीने आपल्या स्कुटीवर प्रमाणापेक्षा जास्त सामान बसवले आहे. अशाप्रकारचा रस्त्यावरील निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्यक्ती एवढ्याशा जागेवर बसून ज्यापद्धतीने स्कुटी चालवत आहे, ते पाहून सर्वत थक्क झाले आहेत.

हा व्हिडीओ आतापर्यंत ७ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर, २६ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.