Drunk Man Viral Video : दारूच्या नशेत लोक कधी काय करतील सांगता येत नाही. अनेकदा ते आग, साप वा महाकाय प्राण्याशी पंगा घेतानाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशा नशेबाज लोकांना आपण काय करतो आहोत याचेदेखील भान नसते. अशा वेळी ते असे काही वागतात की, ज्यामुळे ते स्वत:चाच जीव धोक्यात घालतात. नशेच्या धुंदीत माणसाचे डोके नीट काम करीत नाही. आपण जे काही करतोय ते योग्य की अयोग्य? हेच अशा लोकांना कळत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका नशेबाज व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मद्यपी व्यक्ती भररस्त्यात शिसारी येईल अशी कृती करताना दिसत आहे. या व्हिडीओतल्या दृश्यातील बीभत्सपणा पाहून कोणालाही किळस आल्याशिवाय राहणार नाही.

दारूच्या नशेत व्यक्तीने प्यायले रस्त्यावरील घाण पाणी (Drunk Man Video)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दारूच्या नशेत एक व्यक्ती भररस्त्यात साठलेल्या पाण्यात पडलेली दिसत आहे. ती व्यक्ती बराच वेळ पाण्यात पडून राहते. नंतर काही वेळाने ती उठते आणि तेच घाण, अस्वच्छ पाणी पिते. इतकेच नव्हे, तर त्याच पाण्याने दात घासते. हे पाणी इतके घाण होते की, तुम्ही ते पिणे तर सोडाच; पण त्यात पाय ठेवायलाही मन धजावणार नाही. यावेळी रस्त्यावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे बघत असते; पण त्याला मुळी आपण काय करतोय याचे भानच नसते. एका व्यक्तीने याचा व्हिडीओ बनवला; जो सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. (Drunk man viral video)

Read More News : bangladesh crisis : शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर दाखल? Video नेमका कधीचा? अखेर सत्य आलं समोर

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर lovesutta नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्सकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले आहे की, हा पुनित सुपरस्टारचे जीवन जगत आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, २० वर्षांनंतर पुनित सुपरस्टार. आणखी एका युजरने लिहिले की, याने तर आजपर्यंतचे सर्वांचे रेकॉर्ड मोडले आहेत. अनेक युजर्सनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.