Shocking video: अनेकांना दारूचं व्यसन असतं. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. दारूसाठी घरातलं साहित्य किंवा दागिने विकल्याच्या आणि दारूच्या नशेत वाईट कृत्य केल्याच्या बातम्या नेहमी आपल्या कानावर पडत असतात. दारूसाठी लोक काहीही करू शकतात. मद्यप्रेमी दारूसाठी कोणत्याही गोष्टीचा मुलाहिजा बाळगत नाहीत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तळीरामांनी चक्क पोलिसांसमोर दारूची लूट केली आहे. ५० लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली होती आणि हीच दारू नष्ट करण्यासाठी त्यांनी सर्व दारू एका ठिकाणी ठेवली होती. मात्र, तळीरामांना हे सगळे पाहून मोह आवरला नाही आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

फुकट तिथे प्रकट

फुकट तिथे प्रकट, या म्हणीनुसार हे मद्यप्रेमी दारूवर जणू तुटून पडले होते. आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये पोलिसांनी दारूच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी रांगेत ठेवल्या होत्या. पण, या रांगेने मद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर काय झाले असेल याची तुम्ही स्वतःच कल्पना करू शकता. जप्त केलेल्या या दारूच्या बाटल्या विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी एका रांगेत रस्त्यावर ठेवल्या होत्या. पण, मद्यपींनी मोह न आवरल्याने त्यावर डल्ला मारला. तळीरामरूपी बदमाश आपले काम करीत राहिले आणि पोलीस त्यांना रोखण्यात अपयशी ठरले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दारूच्या बाटल्यांवर दारूबाज कसे तुटून पडले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी पोलीस जे काही प्रयत्न करीत आहेत; त्याचा या बदमाशांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. बाटली घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रोखले आणि बाटली खाली ठेवण्यास सांगितले. पण, तरीही हा तरुण काही ऐकायचे नाव घेत नव्हता. शेवटी तो दारूची बाटली उचलून तेथून पळून गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी विविध कारवायांमध्ये सुमारे ५० लाख रुपयांची दारू जप्त केली होती आणि बुलडोझरद्वारे ती नष्ट करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध जमा करण्यात आली होती. त्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दारूची लूट सुरू केली. दारूची लूट करताना पोलिसांचेही त्यांनी ऐकले नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking Video: पोटासाठी राबणाऱ्या त्या माऊलीची चूक काय? रस्त्याच्या कडेला झाडू मारणाऱ्या महिलेला कारनं उडवलं

सुधाकर उदुमुला नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि अनेकांनी त्याला लाइकही केले आहे. अशातच सोशल मीडिया युजर्सही व्हिडीओबाबत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “भाऊ, वाटून द्या, गरिबांचा आशीर्वाद मिळेल.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “दारू प्यायल्यावर कोणाला घाबरत नाही.”