डास मारण्यासाठी लावलेली कॉइल ठरली जीवघेणी; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा तडफडून मृत्यू

मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे.

delhi mosquito news
डासांच्या कॉईलमुळे एकाच घरातील ६ लोकांचा मृत्य़ू झाला आहे. (Photo : Indian Express, social media)

ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका धक्कादायक घटनेमुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. कारण शास्त्री पार्क येथील एकाच घरातील ६ लोकांचा डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉईलमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यापैकी अनेकजण घरातील डास मारण्यासाठी किंवा त्यांना पळवण्यासाठी घरामध्ये कॉईल लावतात. पण याच कॉईलने सहा जणांचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री पार्क भागातील एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह सापडले. हे सर्व लोक झोपेत असताना डासांपासून बचाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या कॉईलमुळे तयार झालेला कार्बन मोनॉक्साईड शरिरात गेल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. याबाबतची माहिती दिल्लीतील शास्त्री पार्क येथील डीसीपींनी दिली आहे.

हेही वाचा- वडिलांचे ‘ते’ चार शब्द ऐकून ९ वर्षीय ‘इन्स्टा क्वीन’ ची आत्महत्या? पोलिसांना मात्र वेगळाच संशय, जाणून घ्या प्रकरण

शुक्रवारी दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका कुटुंबातील सदस्य डास घालवणारे कॉईल लावून झोपले होते. या घरात रात्री आग लागल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. शिवाय हे सर्वजण झोपेत असताना रात्रीच्या वेळी डासांची कॉइल गादीवर पडल्यामुळे आग लागली आणि विषारी धुरामुळे घरात अडकलेल्या सदस्यांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं ईशान्य जिल्ह्याचे डीसीपी जॉय तिर्की यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. या घटनेत एकूण नऊ जणांचा समावेश होता, त्यापैकी दोघांवर उपचार सुरू असून एकाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या दुर्घटनेत चार पुरुष, एक महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 17:30 IST
Next Story
“चित्रपट पहा आणि पैसे कमवा” घरबसल्या पैसे कमावण्याचा मोह नडला; महिलेची १२ लाखांची फसवणूक, जाणून घ्या प्रकरण
Exit mobile version