नवरीने नातेवाईकांसोबत केला जबरदस्त भांगडा डान्स, लग्नाचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

धडाकेबाज भांगडा करणारी नवरीबाई सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तिच्या जोश पाहून सारेच जण तिचं कौतुक करत आहेत.

Bride-Bhangara-Viral-Video
(Photo: Instagram/ theweddingministry)

हल्ली लग्नात नवरी नवरदेवाच्या डान्सचा जणू ट्रेंडच बनला आहे. नवरीच्या डान्सशिवाय लग्न हल्ली तर अपूर्ण असल्यासारखं वाटू लागतं. लग्नात सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळवून रहावेत यासाठी नवरी तिच्या डान्ससाठी अगदी महिनाभरापासूनच तयारी करत असते. त्यानंतर जेव्हा तिला लग्नात स्टेजवर डान्स करण्याची संधी मिळेत त्यावेळी मात्र ती पूर्ण जोशमध्ये डान्स करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असते. अशाच एका पंजाबी नवरीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरीने चक्क भांगडा डान्स केलाय. धडाकेबाज भांगड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही आतापर्यंत लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण पंजाबी लग्नाची बातच काही और असते. पंजाबी लोक लग्नात धम्माल करण्यासाठी केवळ निमित्त शोधत असतात. लग्नातल्या प्रत्येक क्षणाचा ते आनंद घेत असतात. अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत ते लग्नात फूट टू धम्माल मस्ती करत असतात. विशेषतः नवरदेव जेव्हा लग्नमंडपात वरात घेऊन येतो, त्यावेळी मात्र ढोलाच्या तालावर भांगडा करत खरी रंगत आणत असतात. लग्नात पंजाबी लोक ज्या पद्धतीने सोहळे एन्जॉय करतात, त्याला कशाचीच तोड नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव देणारा व्हिडीओ सध्या लोकांना खूप आवडू लागला आहे.

आणखी वाचा : लग्नात नवरा नवरीने केला जबरदस्त क्लासिकल डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरी आपल्या नातेवाईकांसोबत धडाकेबाज भांगडा डान्स करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हायरल व्हिडीओमधली नवरी कोणत्याही गाण्यावर भांगडा करू शकते. सुंदर लेहेंगा परिधान करून डान्स करताना ही नवरी खूपच सुंदर दिसतेय. अंगावर इतका भरजरी लेहेंगा आणि आकर्षिक दागिने परिधान करून ही नवरी अगदी जोशमध्ये भांडगा करताना दिसून येतेय.

आणखी वाचा : दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला? VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चिमुरडीच्या हुशारीसमोर आईही हरली, तिने जे केलंय त्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल

हा व्हिडीओ theweddingministry नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. “पंजाबी नवरी कोणत्याही गाण्यावर भांगडा सादर करू शकते” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक धकाडेबाज भांगडा करणाऱ्या नवरीबाईचं लोक भरपूर कौतुक करत आहेत. अनेक युजर्सनी या नवरीच्या डान्सवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dulhan dance ka video google trends today bride bhangra beautiful wedding day went viral prp

Next Story
VIDEO : ‘‘गांगुलीलासुद्धा वर्ल्डकप जिंकता आला नाही…”, रवी शास्त्रींचा विराटला उघड पाठिंबा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी