Wedding Gift : काहीही हं! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला जे गिफ्ट दिलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल, हा VIRAL VIDEO पाहाच…

नवरी आणि नवरदेव स्टेजवर असतात तेव्हा पाहुणे त्यांच्यासोबत केवळ फोटोच काढत नाहीत तर त्यांना गिफ्टही देतात. नवरी आणि नवरदेवाचे काही असेही मित्र-मैत्रिणी असतात जे गिफ्टच्या बाबतीतही मस्करी करतात. असाच हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

Bride-Funny-Gift-viral-video
(Photo: Instagram/ theshaadiswag)

नवरी आणि नवरदेव स्टेजवर असतात तेव्हा पाहुणे त्यांच्यासोबत केवळ फोटोच काढत नाहीत तर त्यांना गिफ्टही देतात. नवरी आणि नवरदेवाचे काही असेही मित्र-मैत्रिणी असतात जे गिफ्टच्या बाबतीतही मस्करी करतात. कोणालाच माहिती नसतं की या गिफ्ट बॉक्समध्ये नेमकं काय आहे. त्यामुळे हे गिफ्ट उघडण्यासाठी ते स्टेजवरच आग्रह करू लागतात. सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणीही हैराण होईल. नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला असं गिफ्ट दिलं जे पाहूनच लोक हैराण झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “लग्नात असं कुणी गिफ्ट देतं का?”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, नवरी- नवरदेव स्टेजवर आरामात उभे असतात. जेव्हा त्यांचे मित्र भलामोठा कार्टून बॉक्स हातात पडकत स्टेजवर येत असतात. हे गिफ्ट इतकं मोठं होतं की ते पडकण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच मित्रांनी ते उचलून आणलं होतं. कार्टून बॉक्सचा वरचा भाग फुलांनी आकर्षक सजावट केलेला होता. या बॉक्सचा मोठा आकार पाहून लोकांनी त्यात काय गिफ्ट असेल याबाबत अंदाज बांधायला सुरूवात केली होती. यात काहीतरी मोठं गिफ्ट असणार असं काही जणं बोलत होते. अनेकजण यात फ्रीज असल्याचं सांगत होते तर काहींनी यात वॉशिंगमशीन असेल असा अंदाज बांधू लागले होते.

सर्व मित्र कार्टून बॉक्ससह थेट स्टेजवर पोहोचतात आणि नवरी नवरदेवासोबत अनेक फोटो क्लिक करतात. त्यानंतर हा भलामोठा कार्टून बॉक्स नवविवाहित जोडप्याच्या हाती सोपवतात. आकाराने इतका मोठा दिसत असलेला हा कार्टून बॉक्स नवरी नवरदेवाने हातात पडकल्यानंतर त्यांना तो हलका वाटू लागला. यानंतर व्हिडीओमध्ये जे काही दिसतं ते खूप मजेदार आहे. खरं तर, नवरीला कार्टून बॉक्स मिळताच तिला प्रचंड हसू लागली. कारण ती पेटी पूर्णपणे रिकामी होती, हे तिला कळलं होतं. नवरीला असं खळखळून हसताना पाहून मग तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागतात.

आणखी वाचा : मरणाच्या दारात असलेल्या मांजरींना वाचवण्यासाठी वापरला हा ‘देसी जुगाड’; पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाईकवर स्टंट करत मुलींना इम्प्रेस करायला गेला, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे हे मात्र अद्याप कळलेलं नाही. theshaadiswag नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. नवरी आणि नवरदेवदेखील हे अजब गिफ्ट पाहून हसू लागले. तरुणींनी केलेली ही मस्करी सर्वांच्याच पसंतीस उतरली. याच कारणामुळे यूजर्सही या व्हिडीओवर भरपूर कमेंट करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ८२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

आणखी वाचा : दुबईमध्ये अवतरला ‘अलाद्दिन’! कधी पाण्यावरून तर कधी रस्त्यावरून जादुई चादरीवर बसून फिरतोय; VIRAL VIDEO पाहाच…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स देखील खूपच मजेदार आहेत. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅशटॅग देण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dulhan ka gift bride funny gift dulha dulhan ka video bride groom video google trends trending video friends gave such gift to bride in marriage wont stop laughing video went viral prp