VIRAL VIDEO : नवरदेवाच्या मित्रांचा ‘धांसू’ डान्स; स्टेजवर केलं असं काही की पाहताच लाजेनं गुलाबी झाली नवरी

नवरा-नवरीसाठी काहीतरी स्पेशल करत त्यांना सरप्राईज देण्याचा हल्ली ट्रेंड सुरूय. यात विशेषतः नवरदेवाचे भाऊ आणि मित्र मागे नसतात. सध्या अशाच नवरदेवाच्या मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

friends-surprise-bride-by-doing-this-yaara-teri
(Photo: Instagram/ couple_official_page)

सध्या सोशल मीडियावरती आपल्याला लग्नाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ लग्नाच्या विधीचे असतात, तर काही व्हिडीओ हे लग्नातील अशा काही घटनेचे असतात, ज्यामुळे व्हि़डीओ पाहाणाऱ्या लोकांचे खूप मनोरंजन होते. लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी अनेकजण काहीना काही युक्त्या वापरतात. नवरा-नवरीसाठी काहीतरी स्पेशल करत त्यांना सरप्राईज देण्याचा हल्ली ट्रेंड सुरूय. यात विशेषतः नवरदेवाचे भाऊ आणि मित्र मागे नसतात. सध्या अशाच नवरदेवाच्या मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात नवरदेवाच्या मित्रांनी धांसू डान्स तर केलाच, पण सोबत शेवटचा असं काही तरी केलं की ते पाहून स्टेजवर उभी असलेली नवरी सुद्धा लाजून अक्षरशः गुलाबी होऊन जाते. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

लग्न ठरताच मित्रमैत्रिणी थट्टा करण्याची एक संधी सोडत नाही. लग्नात तर ते काय करतील याचा नेम नाही. लग्नात नवरा-नवरीकडेच सर्वांचं लक्ष असतं. पण या व्हिडीओत तुमचं लक्ष नवरा-नवरी नाही तर थेट डान्स करत स्टेजवर नवरा नवरीला भेटायला आलेल्या मित्राकडेच जाईल. या मित्रांनी नवरा-नवरी समोर येऊन जे केलं ते पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. आपल्या मित्राचं लग्न होणार याचा आनंद प्रत्येक मित्राला असतो. प्रत्येक जण तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. पण कदाचित या मित्रांनी जसा आनंद व्यक्त केला असेल तसा क्वचितच कोणत्या तरी मित्रांनी व्यक्त केला असेल. नवरदेवाच्या या मित्रांनी स्टेजवर जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत एंट्री केली. हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन या मित्रांची गॅंग नवरा-नवरीसमोर येतात आणि गुडघ्यावर बसून हे सर्व मित्र नवरा-नवरीला अगदी फिल्मी अंदाजात हातातलं गुलाबांच्या फुलांचा गुच्छा देऊ करतात.

लग्नात मित्रांची ही फिल्मी एंट्री पाहून नवरी सुद्धा आनंदीत होते आणि त्यांच्यासोबत डान्स करताना दिसून येतेय. सुंदरा लेहेंगा परिधान करून आपल्या भावी पत्नीला थिरकताना पाहून नवरदेव सुद्धा खूश होतो. मित्रांनी दिलेलें हे अनोखं सरप्राईज दोघांनाही आवडतं. पण नवरदेवाच्या मित्रांनी शेवटला जे केलं ते पाहून सारेच जण अवाक झाले. आपला मित्र दुसरा कुणाचा तरी झालाय, हे पाहून ही मित्रांची गॅंग नवरीला दंडवत घालताना दिसून आले. हे पाहून फक्त तुम्हीच नव्हे तर नवरी सुद्धा आश्चर्य होते. पण चेहऱ्यावर गोड स्माईल देत या मित्रांना इशारे करताना दिसून येतेय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सारखी ड्रेसिंग, सारखे हावभाव देत जुळ्या बहिणींनी ‘Manike Mage Hithe’ गाण्यावर केला ‘सेम टू सेम’ डान्स

आणखी वाचा : दोघांत तिसरा? ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्यासोबत गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ VIRAL VIDEO वर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस म्हणाले…

हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. मित्राचं लग्न असावं तर असं किंवा मित्र असावेत तर असे, अशाच काहीशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. नवरदेवाच्या मित्रांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ६४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘couple_official_page’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dulhe ke friends ka dhaansu dance friends surprise bride by doing this yaara teri darshan raval viral video prp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी