Viral Video: पठाण नव्हे, आता सोशल मीडियावर 'तेरे नाम'ची हवा, २३ मिलियन लोकांनी पाहिलेला व्हिडीओ एकदा पाहाच | duplicate salman khan video clip went viral on Instagram tere naam movie hairstyle salman khan trending videos on internet nss 91 | Loksatta

Viral Video: पठाण नव्हे, आता सोशल मीडियावर ‘तेरे नाम’ची हवा, २३ मिलियन लोकांनी पाहिलेला व्हिडीओ एकदा पाहाच

डुप्लिकेट सलमान खानच्या त्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Duplicate Salman Khan Viral Video On Internet
डुप्लिकेट सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल झाला. (Image-Graphics Team)

Duplicate Salman Khan Viral Video : संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत बोलबाला असलेल्या अभिनेता सलमान खानची स्टाईल करायला अनेकांना आवडतं. कारण सलमान खानने त्याच्या अष्टपैलू अभिनयासह हटके स्टाईलचाही सिनेविश्वात ठसा उमटवला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तेरे नाम चित्रपटानंतर सलमान खान कोट्यावधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनला. कारण तेरे नाम चित्रपटातील लव्ह स्टोरीने सिनेविश्वात अधिराज्य गाजवलच पण सलमानची हेअरस्टाईल लाखो प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली. देशातील तरुण मुलांमध्ये सलमान सारखीच हेअरस्टाईल करण्याचं फॅड प्रचंड वाढलं. जवळपास २० वर्षानंतरही सलमानच्या हेअरस्टाईलचा डंका वाजत असल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यामातून समोर आलं आहे. डुप्लिकेट सलमान खानचा तेरे नाम चित्रपटातील हेअर स्टाईलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एकीकडे पठाण चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला असतानाच आता डुप्लिकेट सलमान खानचा व्हिडीओनं इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सलमान खानचा तेरे नामा चित्रपट २००३ मध्ये बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. हा चित्रपट सिनेविश्वात गाजलाच नाही तर सलमानच्या हेअरस्टाईलचं वेडंही त्याच्या लाखो चाहत्यांना लागल्याचं समोर आलं होतं. तसंच सलमानचा तेरे नाम चित्रपटातील अंदाज आणि त्याच्या जबरा लुकची क्रेझ तरुण मुलांमध्ये वाढत असल्याचं व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं होतं. आताही एका तरुणाने सलमान खानसारखा लूक आणि हेअरस्टाईल केली असून त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तेरे नाम चित्रपटात सलमान खानने केलेली हेअरस्टाईल आणि काळा चष्मा घालून डुप्लिकेट सलमान पोज देत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – फेसबुकवरून प्रेम जडलं अन् लग्नासाठी स्वीडनची महिला थेट भारतात पोहोचली, ताजमहलचं कनेक्शन माहितेय का?

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ saritarajput3251 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २३ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ८ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी डुप्लिकेट सलमान खानला चांगलच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हा चोर बाजारातील सलमान आहे.” दुसऱ्या नेटकरी म्हणाला, “हा एक्सपायरी डेटनंतरचा सलमान आहे.” तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, सॅवलोन भाई.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 10:58 IST
Next Story
Video: “चहल भाऊ वहिनी नशेत…”, पार्टीतील ‘त्या’ व्हिडीओमुळे धनश्री वर्मा ट्रोल