E-Rickshaw Smart App Prank Emotional Video : सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअर्स मिळवण्याची स्पर्धा कोणत्या थराला जाऊ शकते, याचे एक हृदयद्रावक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. काही जण ई-रिक्षाला एका ‘स्मार्ट ॲप’च्या मदतीने बंद करण्याचा प्रँक करत आहेत. हे लोक कोणताही विचार न करता एखाद्या गरीब ई-रिक्षा चालकाचे वाहन लॉक करून टाकतात, ज्यामुळे त्या चालकाला आपली दिवसभराची मजुरी आणि उपजीविका गमवावी लागत आहे. या प्रँकमुळे केवळ मानवी संवेदनांनाच धक्का बसला नाही, तर कंटेंटच्या (Content) नावाखाली एखाद्या गरिबाची रोजीरोटी हिरावून घेणे कितपत योग्य आहे? असा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुण या अत्यंत संतापजनक प्रँकचा निषेध करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो सांगतोय की, काही लोक एका ‘ॲप’च्या साहाय्याने ई-रिक्षाला भर रस्त्यात थांबवतात आणि नंतर त्याची मजा घेतात. बिचाऱ्या रिक्षाचालकाला समजतच नाही की त्याची गाडी अचानक कशी काय बंद पडली.

हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने अत्यंत भावनिक शब्दांत परिस्थिती मांडली आहे. त्याने सांगितले की, एक ई-रिक्षा चालक दिवसभर १०-१० रुपयांची सवारी बसवून कष्टाने ४०० ते ५०० रुपये कमावतो. याच पैशातून त्याच्या घरची चूल पेटते. मात्र, प्रँक करणारे हे लोक नंतर ५०० रुपये देऊन रिक्षाचे लॉक उघडण्याचे नाटक करतात.

रिक्षावाले काका रडले

व्हिडिओमध्ये एका वृद्ध ई-रिक्षा चालक काकांना रडताना पाहिले जाऊ शकते. ते सांगत आहेत की, या प्रँकमुळे त्यांची दिवसभराची पूर्ण कमाई बुडाली. व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाने लोकांना समजावून सांगताना म्हटले की, “पुरुष इतक्या सहज रडत नाही. विचार करा, ते पैसे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे असतील, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. कृपया असे करू नका.”

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा राग अनावर झाला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक सतत त्या ॲपवर बंदी घालण्याची मागणी करत आहेतृसोशल मीडियावर सध्या ई-रिक्षाला ‘स्मार्ट ॲप’द्वारे लॉक करण्याचा एक अत्यंत क्रूर प्रँक व्हायरल होत आहे. दिवसभराची कमाई हिरावून घेतल्यामुळे हताश झालेल्या एका वृद्ध चालकाचा रडतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी प्रचंड संतापले आहेत.झ, ज्याचा वापर या प्रँकसाठी केला जात आहे. हजारो युजर्सनी ‘ॲप बॅन बटन’ लिहून हे ॲप प्ले स्टोअरवरून त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

एका युझरने अत्यंत मार्मिक भाष्य करताना लिहिले, “ज्या लोकांनी कोणाच्या रोजीरोटीला स्वतःचे कंटेंट बनवले आहे, त्यांनाही कधीतरी अशाच लाचारीचा सामना करावा लागो. तेव्हा त्यांना समजेल की ई-रिक्षा हे कोणतेही कंटेंट नसून, कोणाच्या तरी जगण्याचा एकमेव आधार आहे.” तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, “मला अभिमान आहे की मी अशा कृत्यांमध्ये सामील होत नाही.”