scorecardresearch

Video: गरुडाचाही पापलेट माशावर डोळा, तोंडाला पाणी सुटल्यावर नेम धरला, पण समुद्रात घडलं असं काही…

हजारो फूट उंचावरून गरुडाने पापलेट माशावर नेम धरला, पण घडलं असं काही….; पाहा थरारक व्हिडीओ

Video: गरुडाचाही पापलेट माशावर डोळा, तोंडाला पाणी सुटल्यावर नेम धरला, पण समुद्रात घडलं असं काही…
गरुड पक्षाचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला. (Image-Instagram)

Eagle Bird Viral Video : घनदाट जंगलात झाडांवर असलेल्या घरट्यांमध्ये शेकडो पक्षांचा किलबीलाट सुरु असतो. काही पक्षी छोट्या मोठ्या किटकांना खाऊन पोटाची खळगी भरत असतात. हजारो पक्षांचे थवे आकाशात उडतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. पण इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओनं शेकडो नेटकऱ्यांना आश्चर्यचकीत केलं आहे. कारण या व्हिडीओत पक्षांचा किलबीलाट नाही, तर गरुडाने हजारो फूट उंचीवरून पापलेट माशावर नेम धरला आणि थेट समुद्रात उडी मारली. नॉन व्हेज फूड खाणाऱ्या काही माणसांना पापलेट मासा खायला प्रचंड आवडतो. पण माणसांप्रमाणेच गरुडालाही पापलेट माशावर चोच मारायला आवडतं असल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. पापलेट मासा समुद्रात फिरत असल्याचं गरुडाने पाहिल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्याने थेट समुद्राच्या दिशेन भरारी घेतली. गरुडाने पापलेट माशाची शिकार केल्यावर जे घडलं, ते व्हिडीओत पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

गरुडाने पापलेट माशाला पकडलं अन् गरुडाने घेतली गगनभरारी, पण…

माशाची शिकार केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पाण्यावर तंरगत पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या माशांना पकडणं एखाद्या वेळी सोपं ठरू शकतं. पण थेट पाण्यात जाऊन मोठा मासा पकडण्यासाठी गरुडासारखी तीक्ष्ण नजरच असावी लागते. मासा पकडण्याचं एकच ध्येय समोर ठेवून गरुडाने आकाशातून झेप घेतली अन् पापलेट माशाला पकडलं. पण माशानेही कमालच केली. गरुडाच्या धारधार नखांमध्ये अडकलेला माशाने गरुडाला चकवा देत पुन्हा पाण्यात उडी मारली आणि गरुड पक्षी मात्र उपाशीच राहिला. हे सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाले असून व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याता आला आहे. व्हिडीओत गरुडाचा थरार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

नक्की वाचा – ‘पठाण’ प्रदर्शीत होण्याआधीच या तरुणींनी घातलाय धुमाकूळ, चक्क जमिनीवर झोपूनच उधळले ‘बेशरम रंग’, बोल्ड डान्सचा Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

पक्षांमध्ये सर्वात चपळ आणि चालाख पक्षी म्हणून गरुडाकडे पाहिलं जातं. कारण या गरुड पक्षाची नजरच जमिनीवर सरपटणाऱ्या सापावर किंवा पाण्यात पोहणाऱ्या माशांवर भिडलेली असते. गरुड पक्षाकडे असेलेली तीक्ष्ण नजर पाहून अनेकांना त्यांच्यात डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कारण हजारो फूट उंचीवरून पाण्यातील माशाला पाहणं, इतरांसाठी अशक्य गोष्टच असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गरुडाने माशाची केलेली खतरनाक शिकार पाहून सोशल मीडियावर नेटकरी चक्रावून गेले आहे. विषारी सापालाही भक्ष्य बनवणारा गरुड पक्षी नेहमीच इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतो. कारण त्याच्याकडे असणारी तल्लख बुद्धी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आकाशातून भरारी घेत पाण्याच्या खोलात जाऊन मासा पकडणे आणि त्यानंतर उडत असतानाच चोचीने तो खाणे, हे फक्त गरुडासारख्या पक्षालाच जमतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 18:04 IST

संबंधित बातम्या