मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा त्याबाबतील गुगल शीट्स समजणं गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे काम करताना अनेकदा अडचणी येतात. यामुळे एखाद्या एक्स्पर्टची मदत घेऊन अडचणी सोडवली जातात. मात्र प्रत्येक वेळी एखादा एक्स्पर्ट जागेवर असेलच असं नाही. अनेकदा एखादी अडचण आली तर संबंधित व्यक्ती येईपर्यंत ताटकळत राहावं लागतं. या सर्व समस्यांचा अभ्यास करून कॅट नॉर्टन या एक्सेल संदर्भातल्या टिप्स आणि युक्त्या ऑनलाइन माध्यमातून शिकवते. इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिने एक्सेल टिप्स देणारा एखादा व्हिडिओ शेअर केला की त्यावर लाखो लोकांच्या उड्या पडतात. एका वर्षाच्या आत इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर तिचे १ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून एक्सेल आणि गुगल स्प्रेडशीट्सबाबत सोप्या शब्दात शिकता येते.

२७ वर्षीय कॅट नॉर्टनने मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऑनलाइन शिकवण्यासाठी तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली. या निर्णयामुळे तिचे जीवन बदलले. द एक्सप्रेसनुसार, इन्स्टाग्रामवर @miss.excel म्हणून ओळखल्या जाणार्‍या, नॉर्टनने नोव्हेंबर २०२० मध्ये तिचा ऑनलाइन शिकवण्याचा व्यवसाय सुरू केला. एक वर्षापूर्वी तिला यात यश मिळू लागलं आणि महिन्याकाठी आता त्या कोट्यवधी रुपये कमवतात.

gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
Facebook Update video player In vertical full screen That Offers alongside video playback controls
फेसबुक देणार इन्स्टाग्राम Reels ला टक्कर! नवीन अपडेटमध्ये होणार ‘हा’ बदल, जाणून घ्या
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

देशात गाढवांच्या संख्येत झपाट्याने घट; एका सर्व्हेतून समोर आली धक्कादायक कारणं

कॅट नॉर्टन या मिस एक्सेल नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत. आता ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण-वेळ ट्रेनिंग देतात. केवळ मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि Google शीट्सवरच नव्हे तर इतर मायक्रोसॉफ्ट आणि ऑनलाइन उत्पादनांबाबतही माहिती देतात. नॉर्टन यांची पहिली सहा आकडी कमाई एप्रिल २०२१ मध्ये झाली. या कामासाठी तिला तिच्या प्रियकरांने मोलाची साथ दिली. त्याने नोकरी सोडत नॉर्टनला मदत केली. आता नॉर्टनचं महिना सात आकडी कमाई करण्याचं ध्येय आहे.