Daughter Birthday Surprise Video: प्रत्येकाला आपल्या वाढदिवस इतरांपेक्षा सरप्राईजिंग व्हावा असे वाटते. तुम्ही सोशल मीडियावरही वाढदिवसाच्या हटके सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही म्हणाल कुटुंब असावं तर असं. कारण यात एका कुटुंबाने सदस्यांनी मिळून घरातील लेकीला वाढदिवसानिमित्त असं काही सरप्राईज दिलं की ती ते आयुष्यभर विसरणार नाही.
तुम्ही आजवर पाहिलं असेल की, कुटुंबातील सदस्य मिळून घरातील एखाद्या व्यक्तीला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज देतात. कधी रात्री १२ वाजता झोपेतून उठवून केक कापतात, तर कधी त्यांची अत्यंत आवडती वस्तू गिफ्ट म्हणून आणतात. पण व्हिडीओतील कुटुंबाने ज्याप्रकारे आपल्या मुलीला सरप्राईज दिले ते पाहून तुमचंही मन आनंदाने भरून येईल.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी शाळेतून घरी आलीय. त्यावेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच तिचे स्वागत करण्यात आले. सर्वत्र फुलांच्या पाकळ्या आणि फुग्यांची सजावट करण्यात आली आहे. पूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहे… हा खास क्षण काही जण कॅमेऱ्यात कैद करत आहेत. हे सर्व पाहून ती मुलगीसुद्धा आश्चर्यचकित झाली. ती आधी तिची बॅग काढते आणि घरात प्रवेश करते. प्रवेशद्वारापासून मुलीच्या बेडरूमपर्यंत प्रत्येक पायरीवर तिच्यासाठी खास भेटवस्तू ठेवण्यात आली होती.
अगदी घराच्या प्रवेशद्वारापासून ते तिच्या बेडरूमपर्यंत फुलांची छान वर्तुळं काढलेली आहेत. त्या प्रत्येक वर्तुळाला १, २, ३ असे नंबर दिलेले आहेत आणि त्याबरोबर एक भेटवस्तू, मुलगी प्रत्येक वर्तुळात पाऊल ठेवते आणि एक भेटवस्तू उचलते. त्यामुळे इतक्या भेटवस्तू जमा होतात की, तिला त्या हातात पकडणेसुद्धा अशक्य होते. याचदरम्यान, कुटुंबातील एक सदस्य तिच्या हातातील काही भेटवस्तू घेतो. त्यानंतर मुलीला एक पिन दिली जाते, ज्याने ती फुगे फोडते आणि आपल्या बेडरूमच्या दिशेने जाते. तिच्या बेडरूमपर्यंत पोहोचेपर्यंत तिच्या बेडवरही छानशी सजावट करून केक ठेवलेला असतो. तसेच आणखी काही भेटवस्तू तिथे असतात. अशा प्रकारे तिच्यासाठी प्रत्येक वर्तुळातील भेटवस्तू मिळून १४ भेटवस्तू ठेवलेल्या असतात. त्यानंतर तिची आई तिचं औक्षण करण्यासाठी येते. हा वाढदिवस मुलीच्या नेहमी लक्षात राहील अशा रीतीने साजरा केल्याचे लक्षात येते.
कुटुंबाने मिळून तिचा वाढदिवस कायमचा अविस्मरणीय बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक युजर्सही म्हणतायत की, त्यांनाही असं कुटुंब हवं आहे.
“हीच तर एकत्र कुटुंबाची खासियत आहे.” युजर्सच्या कमेंट्स
sanjeevpandey479 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर एका युजरने लिहिले, “हीच तर एकत्र कुटुंबाची खासियत आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “भाऊ, मला असं कुटुंब कुठे मिळेल? मलाही असंच कुटुंब हवं आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “ताई, खूप नशीबवान आहेस. कुटुंबातील सर्व जण एकत्र मिळून आनंद साजरा करत आहेत.” शेवटी एका युजरने लिहिले, “भाऊ, हा व्हिडीओ कुठून आला? या जगात हे अशक्य आहे.”
