scorecardresearch

Viral: पेरू खाण्याची विचित्र पद्धत सोशल मीडियावर व्हायरल; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. जगावेगळं करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याचं प्रयत्न असतो.

Guava_Eat_Viral_Video
Viral: पेरू खाण्याची विचित्र पद्धत सोशल मीडियावर व्हायरल; व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. जगावेगळं करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याचं प्रयत्न असतो. कधी कधी काही व्हिडीओ आश्चर्याचा धक्का देतात. तर कधी कधी व्हिडीओ पाहून हसू आवरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी पेरू खाण्यास शिकवत आहे. ही पद्धत पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक जण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत आणि मजेशीर कमेंट्स करत आहेत.

व्हायरल व्हिडीओत एक मुलगी दिसत आहे. तिने हातात पेरूची फोड घेतली आहेत. त्यानंतर मुलगी कॅमेऱ्यासमोर कापलेली फोड दाखवते. पेरूची फोड मोठी असल्याने सहज खाणं शक्य नाही असं दिसतंय. मात्र मुलगी पूर्ण फोड तोंडात टाकते. त्यानंतर हळू हळू करून पेरूची फोड खाण्यास सुरुवात करते. मात्र यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. एक तर पेरूची मोठी फोड असल्याने चावताना तिला त्रास होत असल्याचा अंदाज येत आहे. मात्र तरीही ती पेरू खात आहे. या व्हिडीओतील तिचे हावभाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मुलीची पेरू खाण्याची ही विचित्र पद्धत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eation guava funny video gose viral on social media rmt