scorecardresearch

बेरोजगारीवर तोडगा! पाटण्यातला ‘ग्रॅज्युएट चायवाली’चा video viral; नोकरी न मिळाल्यानं सुरू केला बिझनेस

बेरोजगारीपुढे हार न मानता प्रियंका गुप्ता नावाच्या तरुणीने थेट चहाचा स्टॉल टाकण्याचा निर्णय घेतला.

graduate chaiwali

सध्याच्या काळात तरुणाईला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. गेल्या दोन वर्षात करोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे हा प्रश्न आणखी गंभीर बनला. याच बेरोजगारीपुढे हतबल झालेल्या एका पदवीधर तरुणीनं नोकरीचा नाद सोडत स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. या तरुणीचं नाव आहे प्रियंका गुप्ता. प्रियंकाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

कोण आहे प्रियंका गुप्ता?

मुळची बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या प्रियंकानं २०१९ साली अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ती स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली. परंतु प्रयत्न करूनही तिला नोकरी मिळाली नाही. याच दरम्यान, तिने एमबीए चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिलौरचा एक व्हिडीओ पाहिला आणि स्वतःचा चहाचा स्टॉल उघडण्याचा निर्णय घेतला. प्रियंका पाटण्यातील मुलींच्या महाविद्यालयासमोर चहाचा स्टॉल चालवते.

(हे ही वाचा: Video: प्रेयसीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)

कशी केली सुरुवात?

चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रियंकानं बँकेत लोनसाठी अर्ज केला. पण बँकेनं लोन दिलं नाही. पण तिनं हार न मानता मित्र-मैत्रिणींच्या मदतीनं व्यवसाय सुरू केला. तिने चहाचा स्टॉल लावण्यासाठी नोंदणीकृत जागा मिळावी म्हणून महानगरपालिकेत अर्ज केला. पण तो अर्ज रद्द करण्यात आला. सध्या ती पाटण्याच्या वूमेन्स कॉलेजपुढे चहाचा स्टॉल लावते. शिक्षणासाठी आलेल्या प्रियंकानं चहा विकण्याचा निर्णय घेतला, त्याची कल्पना घरच्यांना नव्हती. नंतर तिने याबद्दल घरी सांगितलं. प्रियंकाला वाटलेलं की विरोध होईल, पण घरच्यांनी तिचा निर्णय स्वीकारला आणि तिचा बिझनेस सुरू झाला. सध्या प्रियंका तिच्या लहान भावासोबत पाटण्यात राहून हा चहा विकतीये.

(हे ही वाचा: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल! देसी जुगाड बघून नेटीझन्स झाले आश्चर्यचकीत)

नोकरी न मिळाल्याने हताश होणाऱ्या तरुण पीढीसाठी प्रियंका खरंच प्रेरणादायी आहे. नोकरीच्या मागे न लागता तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि हाच व्यवसाय तिची ओळख बनला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Economics graduate turns into chaiwali after she fails to find a job ttg

ताज्या बातम्या