scorecardresearch

आठ वर्षांच्या चिमुरड्यानं १४० च्या स्पीडनं जॉयराइडसाठी चोरली वडिलांची कार

मला केवळ थोडावेळच कार चालवायची होती, पोलिसांना सांगितले

जर्मनीत एक आठ वर्षांचा चिमुरड्याल महामार्गावर तब्बल १४० किलोमीटर प्रतितास वेगाने जॉयराइडसाठी वडिलांची चोरलेली कार चालवताना आढळला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगण्यात आले आहे की, त्याला जॉयराइडचा आनंद घ्यायचा होता आणि डॉर्टमुंडच्या दिशेने जात असताना बुधवारी सकाळी तो महामार्गावर आढळला.

मला केवळ थोडफारच कार चालवायची होती, असे त्याने पोलिसांना सांगितले व आई दिसल्यावर तो रडू लागला. कारमधील धोका दर्शवणारे लाईट सुरू होते व कारच्या पाठीमागे सावधानतेचा इशारा देणारे त्रिकोणी चिन्ह देखील लावलेले होते.

फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये पोलिसांनी याबाबत म्हटले की, सुदैवाने या राइडनंतर कोणत्याही व्यक्तीस इजा किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
पोलीस अधिकाऱ्यांना या मुलाच्या आईने सांगितले की, तो त्यांच्या सोस्ट येथील राहत्या घरी स्वयंचलित व्हीडब्ल्यू गोल्फमध्ये जात होता. त्यानंतर तो महामार्गावर गेल्याचे त्यांना कळाले. याबाबत त्यांना संबधित अधिकाऱ्यांना कळवले होते. विशेष म्हणजे अतिवेगाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कार थांबल्याचेही त्या मुलाने पोलिसांना सांगितले.

यावरून असे दिसून येत आहे की या मुलाने या अगोदरही त्यांची स्वतःची कार चालवण्याचा आनंद घेतलेला आहे. शिवाय त्याने बम्पर कार आणि गो-कार्टसही वारंवार चालवली असल्याचे दिसते असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eight year old german boy steals car from parents for 140 kmph joyride msr

ताज्या बातम्या