Dance viral video: लग्न समारंभ म्हटला की, तरुण मुली, नटून-थटून तयार होऊन आलेले पाहुणे आणि मैत्रिणी यांचा जबरदस्त डान्स लग्नात बघायला मिळतो. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ काही वेगळाच आहे. कारण- या लग्नात फक्त तरुणीनेच नव्हे, तर आजींनीही केला हटके डान्स.
वयाची चिंता न करता, साडी नेसून, आत्मविश्वासाने आजींनी असा डान्स केला आहे की, पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलंच पाहिजे. हा व्हिडीओ पाहून एकच गोष्ट लक्षात येते. आनंदाला वय लागत नाही. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील आहे. घरात महिला एकत्र जमलेल्या आहेत, ढोल-ताशांचा नाही, तर जुन्या हिंदी गाण्यांचा माहोल बनला आहे. ‘झुमका गिरा रे’ याच गाण्यावर आजींनी डान्स करायला सुरुवात केली.
व्हिडीओत दिसतं की, आजी साध्या साडीमध्ये, कुठलाही देखावा न करता डान्स करीत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि डोळ्यांत दिसते की, डान्स करायची किती आवड आहे. गाण्याच्या तालावर त्यांच्या हाताच्या हालचाली, तो ठुमका आणि चेहऱ्यावरचे भाव तर कमालच. आजूबाजूला उभ्या असलेल्या महिला आजींकडे पाहून हसत आहेत, टाळ्या वाजवत आहेत.
पाहा व्हिडिओ
काही क्षणांसाठी सगळ्यांचं लक्ष फक्त आजींवरच असतं. असं वाटत की, त्या पहिल्यापासून स्टेजवर परफॉर्म करत असाव्यात. त्यांच्या डान्समध्ये कुठलाही देखावा नाही, फक्त मनापासून आलेला आनंद दिसतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका युजरने लिहिलं, “आजींनी तर सगळ्या सुनांना मागे टाकलं.” दुसऱ्यानं म्हटलं, “अशी एनर्जी हवी आयुष्यात.” अनेकांनी या व्हिडीओला ‘खऱ्या आनंदाचं उदाहरण’ असं म्हटलं आहे.
काही जण म्हणतात की, लग्नात खरी मजा तेव्हाच येते, जेव्हा घरातले मोठे लोकही मोकळेपणाने आनंद साजरा करतात. तर काहींनी आजींच्या आत्मविश्वासाचं आणि उत्साहाचं भरभरून कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ फक्त डान्सपुरता मर्यादित नाही. तो एक सुंदर संदेश देतो- आनंद, उत्साह आणि जगण्याच्या मजेसाठी वय आड येत नाही. लग्न असो, सण असो किंवा छोटा समारंभ, जर मन तरुण असेल, तर आपोआपच पाय थिरकतात.
